वन्य प्राण्याच्या हल्यात वृध्द ठार; गेरूमाटरगाव शिवारातील घटना
By अनिल गवई | Published: February 14, 2024 12:17 PM2024-02-14T12:17:11+5:302024-02-14T12:17:32+5:30
बुधवारी सकाळी मृतक बाजीराव यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.
खामगाव: वन्य प्राण्याच्या हल्यात गाय शोधण्यासाठी गेलेला इसम ठार झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी उजेडात आली.
तक्रारीनुसार, माटरगाव गेरू धरणानजिक असलेल्या बोथा फॉरेस्ट शिवारात बाजीराव मांगीलाल चव्हाण ५५ गाय शोधण्यासाठी गेले होते.
दरम्यान, बराच काळ लोटल्यानंतरही ते परत न आल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा जंगलात शोध घेतला असता, १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळ दरम्यान, त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे आढळून आले. तसेच कमरेपासून धड वेगळे आढळून आल्याची तक्रार मृतकाचे भाऊ राजू मांगीलाल चव्हाण ५५ यांनी हिवरखेड पोलीसांत केली. या तक्रारीवरून हिवरखेड पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालणात आणण्यात आला. बुधवारी सकाळी मृतक बाजीराव यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.