बुलडाणा- चिखली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 18:38 IST2021-05-22T18:38:05+5:302021-05-22T18:38:11+5:30
Buldhana News : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

बुलडाणा- चिखली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार
बुलडाणा: शहरालगतच्या सुंदरखेड परिसरात चिखली मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
भावराव काळुबा गवई (७५) असे या अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. शनिवारी सकाळी ते दुध आणण्यासाठी घराच्या बाहेर पडले होते. तेव्हा चिखली मार्गावरील गोलाडे लॉन्स नजीक त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत वृद्धाचे पार्थिवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. याप्रकरणी अज्ञात वाहनचालका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर वाहनासह फरार झालेल्या या वाहनाचा व चालकाचा सध्या बुलडाणा शहर पोलिस शोध घेत आहेत.