बँकेत सोडून देण्याच्या बहाण्याने वृद्धास लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:35 AM2021-09-19T04:35:53+5:302021-09-19T04:35:53+5:30
मोताळा येथील ७२ वर्षीय वृद्ध मधुकर केशव वराडे हे गुरुवारी शहरातील बँकेत कर्जावर घेतलेल्या वाहनाची रक्कम भरण्यासाठी जात असताना ...
मोताळा येथील ७२ वर्षीय वृद्ध मधुकर केशव वराडे हे गुरुवारी शहरातील बँकेत कर्जावर घेतलेल्या वाहनाची रक्कम भरण्यासाठी जात असताना मोताळा पंचायत समितीनजीक दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने त्यांना बँकेत सोडून देतो असा बहाणा करून दुचाकीवर बसवले. सोबतच पंचायत समितीच्या पाठीमागील गणपतीनगराजवळ नेले. मजुरीचे पैसे वाटप करायचे आहे, असे सांगून तुमच्याकडील ५०० रुपयांच्या नोटा द्या दोन हजार रुपयांच्या नोटा देतो, असे सांगत वृद्धाकडील पिशवीत ठेवलेले पैसे घेऊन पलायन केले. याप्रकरणी वराडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
--चोरटा २५ ते ३० वयोगटातील--
वृद्धाचे एक लाख रुपये घेऊन पलायन करणारा भामटा हा २५ ते ३० वयोगटातील असून त्याने अंगात पांढरा शर्ट व काळसर पॅन्ट घातलेली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धांडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बरडे हे करीत आहेत.