जुन्या हंगामातील तूर, हरभऱ्याचे अनुदान आले नव्या हंगामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 03:32 PM2019-12-07T15:32:12+5:302019-12-07T15:32:54+5:30

आतापर्यंत अुनदानाचे वाटप करण्यात आले आहे; मात्र अद्यापही २ कोटी ७५ लाख ११ हजार ८७३ रुपये अनुदान येणे बाकीच आहे.

Old season tours, green grants come in the new season | जुन्या हंगामातील तूर, हरभऱ्याचे अनुदान आले नव्या हंगामात

जुन्या हंगामातील तूर, हरभऱ्याचे अनुदान आले नव्या हंगामात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मागील वर्षीच्या हंगामातील तूर व हरभºयाचे अनुदान एक वर्षानंतर नव्या हंगामात प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७०० शेतकऱ्यांना आतापर्यंत अुनदानाचे वाटप करण्यात आले आहे; मात्र अद्यापही २ कोटी ७५ लाख ११ हजार ८७३ रुपये अनुदान येणे बाकीच आहे. त्यामुळे हजारो शेतकरी आजही तूरीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, त्यांची आर्थिक उन्नती साधावी, यासाठी शासनाकडून हमीभाव ठरवून दिलेला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा शासनामार्फत हमीभावाने खरेदी करण्यात आला.
परंतू काही शेतकºयांचा तूर व हरभरा रात्रं-दिवस नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी रांगा लाऊनही खरेदी होऊ शकला नाही. ज्या-ज्या शेतकऱ्यांनी तूर व हरभरा नाफेडकडे विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली; परंतू ज्या शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा खरेदी झाला नाही, त्या शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. दरम्यान, अनेक दिवस प्रतीक्षा करूनही शेतकºयांना तूर व हरभऱ्याचे हे अनुदान मिळाले नव्हते. खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशावेळी तूर व हरभºयाचे अनुदान मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती.
परंतू ती पूर्ण होऊ शकली नाही. आता दुसºया वर्षीचा रब्बी हंगाम सुरू झाला असताना मागील वर्षीच्या तूर व हरभºयाचे अनुदान वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत तुरीचे २० कोटी ९० लाख ९७ हजार २०० रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. तर उर्वरीत २ कोटी ७५ लाख ११ हजार ८७३ रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शेतकºयांना त्वरेने हे अनुदान मिळावे अशी ओरड होत आहे.
 

९२ टक्के शेतकऱ्यांना मिळाले हरभरा अनुदान
महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत हरभरा अनुदानासाठी १ हजार १७३ शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी ९२ टक्के म्हणजे १ हजार ९० शेतकºयांना अनुदान देण्यात आले आहे. त्यामध्ये मेहकर तालुक्यातील २३९, सिंदखेड राजा ७२, मोताळा १७, बुलडाणा १२६, लोणार ३००, शेगाव १२८ व संग्रामपूर तालुक्यातील १५४ शेतकºयांना हरभºयाचे अनुदान देण्यात आले आहे.


अडीच हजार शेतकऱ्यांचे तूरीचे अनुदान रखडले
४तूरीच्या अनुदानासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत २१ हजार ६२० शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी १७ हजार ६१० शेतकºयांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. तर २ हजार ४११ शेतकºयांचे तूरीचे अनुदानन रखडले आहे.
आतापर्यंत आलेले तूर व हरभºयाचे अनुदाना शेतकºयांना वितरीत करण्यात आले आहे. तूरीचे उर्वरीत अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे. त्याचा प्रस्ताव पाठविलेला आहे. आल्यानंतर ते तातडीने वाटप होईल.
- एम. एच. माने, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा.

Web Title: Old season tours, green grants come in the new season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.