सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा खून; पोलिसांनी बाप-लेकास घेतलं ताब्यात

By सदानंद सिरसाट | Published: September 1, 2022 11:50 PM2022-09-01T23:50:49+5:302022-09-01T23:54:51+5:30

मृतक प्रभा माधव फाळके (६३, रा. गणपती नगर, भाग २) ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरामध्ये पूजेची थैली घेऊन दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून निघून गेल्या होत्या.

Old woman murdered for gold jewelry; The police took the father and daughter into custody | सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा खून; पोलिसांनी बाप-लेकास घेतलं ताब्यात

सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा खून; पोलिसांनी बाप-लेकास घेतलं ताब्यात

googlenewsNext

मलकापूर (बुलडाणा) : सोन्याच्या दागिन्यांसाठी बापलेकाने नगरपरिषदेमधील सेवानिवृत्त कर्मचारी प्रभा माधव फाळके यांची अतिशय क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावरील संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाखाली फेकला. मुक्ताईनगर पोलिसांना २९ ऑगस्ट रोजी आढळलेल्या मृतदेहाबाबत तपास करण्यासाठी आलेल्या पथकाने आरोपी बापलेकाला मलकापुरातील गणपती नगरातून ताब्यात घेतले. 

मृतक प्रभा माधव फाळके (६३, रा. गणपती नगर, भाग २) ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरामध्ये पूजेची थैली घेऊन दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून निघून गेल्या होत्या. त्या परतल्याच नाहीत. याबाबतची तक्रार त्यांचा मुलगा रितेश फाळके यांनी पोलिसांत दिली होती. २९ ऑगस्ट रोजी जळगाव खांदेश जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुडे कुंड गावाजवळ पुलाच्या खाली महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मुक्ताईनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्या महिलेची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. मात्र, ओळख न पटल्याने पोलिसांनी अंत्यसंस्कार आटोपले. त्याबाबतचे फोटो विविध पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले. खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, फोटोवरून मुलगा रितेश यांनी त्यांची ओळख पटविली. त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी मलकापूर शहरात दाखल होत खुनाबाबत माता महाकाली नगर, एसटी बसस्थानक, गणपती नगर व अन्य ठिकाणी चौकशी केली. हत्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी मलकापुरातीलच त्या महिलेच्या घराशेजारी वास्तव्यास असलेल्या भार्गव विश्वास गाढे (२१), विश्वास भास्कर गाढे (४५) या दोघा बापलेकांना ताब्यात घेतले. सोन्याच्या दागिन्यांसाठी हत्या केल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, बांगड्या, गोफ असा २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा तपास मुक्ताईनगर पोलीस उपअधीक्षक कुणाल  सोनवणे, एलसीबी पोलिस निरीक्षक किरण बकाले, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सपोनी शेवाळे यांनी केला.
 

Web Title: Old woman murdered for gold jewelry; The police took the father and daughter into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.