पाचव्या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा एकाचा मृत्यू; रस्त्यावरील गतिरोधकामुळे वाहनधारकांचे बळी

By अनिल गवई | Published: September 19, 2023 05:52 PM2023-09-19T17:52:59+5:302023-09-19T17:53:49+5:30

याप्रकरणी ज्ञानेश्वर अंगत गुंड (४१) यांच्या तक्रारीवरून मृतक रविंद्र घड्याळे विरोधात ग्रामीण पोलीसांनी भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला.

On the fifth day another died at the same place; | पाचव्या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा एकाचा मृत्यू; रस्त्यावरील गतिरोधकामुळे वाहनधारकांचे बळी

पाचव्या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा एकाचा मृत्यू; रस्त्यावरील गतिरोधकामुळे वाहनधारकांचे बळी

googlenewsNext

खामगाव : पाच दिवसांपूर्वी घडलेल्या आँटो अपघातात एकाचा बळी गेल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी रस्ता अपघातात ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजता खामगाव-चिखली रस्त्यावरील गारडगाव फाट्यानजिक सिंधी नाल्यावर घडली.

खामगाव तालुक्यातील नागझरी येथील येथील रविंद्र भारत घड्याळे आणि गोपीचंद चतरसींग घोती दोघे एमएच-२८, एए-५४२ या दुचाकीने जात होते. दरम्यान, गारडगाव फाट्यावर रविंद्र घड्याळे यांचे दुचाकीवरील नियत्रंण सुटले. अनियंत्रित दुचाकी समोरील अज्ञात वाहनावर आदळली. यात रविंद्र घड्याळे याचा जागीच मृत्यू झाला. तर गोपीचंद घोती हा जखमी झाला. घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी त्या व्यक्तीला सामान्य रूग्णालयात मृतावस्थेत दाखल केले. याप्रकरणी ज्ञानेश्वर अंगत गुंड (४१) यांच्या तक्रारीवरून मृतक रविंद्र घड्याळे विरोधात ग्रामीण पोलीसांनी भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला.

गतिरोधकामुळे घडला अपघात

पाच दिवसांपूर्वीच याच ठिकाणी भाजीपाला विक्रेत्याच्या ऑटोला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात गुरूवारी पहाटे एकाचा मृत्यू झाला होता. तर चार जण गंभीर जखमी झाले. ती घटना ताजी असतानाच, त्याच गतिरोधकावर समोरील वाहनाने अचानक गती कमी केल्याने सोमवारी रात्री दुचाकीस्वार पुढच्या वाहनावर जाऊन आदळल्याची चर्चा आहे. तांत्रिक चुकीचे असलेल्या गतिरोधकामुळे गारडगाव फाट्याजवळील गुप्ता यांच्या शेताजवळ नेहमीच अपघात घडतात.

Web Title: On the fifth day another died at the same place;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.