बुलडाणा जिल्ह्याील दीड हजार शेतकरी साैर कृृषी पंपाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:02 PM2020-11-22T12:02:34+5:302020-11-22T12:05:06+5:30

Solar Pumps News वीजेची सुविधा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सौर पंप वरदान ठरत आहे.

One and a half thousand farmers in Buldana district are waiting for another agricultural pump | बुलडाणा जिल्ह्याील दीड हजार शेतकरी साैर कृृषी पंपाच्या प्रतीक्षेत

बुलडाणा जिल्ह्याील दीड हजार शेतकरी साैर कृृषी पंपाच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्दे२ हजार ६५१शेतकऱ्यांच्या शेतात कृषी पंप बसविण्यात आले आहे. ७ हजार ७४१ शेतकऱ्यांनी सौर कृषी पॅनलसाठी अर्ज केलेला आहे. ३ हजार ५२३ शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

 लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शासनाच्या वतीने साैर कृषी पंपाचा वापर करण्यासाठी प्राेत्साहन देण्यात येते. मात्र, जिल्ह्यातील १ हजार ५६१ शेतकऱ्यांना पैसे भरूनही साैर कृषी पंप मिळाले नसल्याचे चित्र आहे.   सौर उर्जेला चालना देण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येते. पाच हार्स पॉवरसाठी एकूण खर्च साधारणत: दोन लाख ३६ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यासाठी अनुसुचीत जातीच्या लाभार्थ्यांना १२ हजार ३१० रुपये तर खुल्या प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांना २४ हजार रुपये भरावे लागतात. जिल्ह्यातील वीजेची सुविधा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सौर पंप वरदान ठरत आहे.

सौर कृषीपंप वरदान
तीन हॉर्स पॉवरच्या कृषी पंपासाठी एक लाख ५७ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना १६ हजार तर अनुसुचीत जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ८ हजार रुपये भरावे लागतात. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज वाहीनी टाकता येत नाही शकत नाही त्यांना सौरपंपाचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.  आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ७४१ शेतकऱ्यांनी सौर कृषी पॅनलसाठी अर्ज केलेला आहे. त्यापैकी ४ हजार २१८ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले असून २ हजार ६५१शेतकऱ्यांच्या शेतात कृषी पंप बसविण्यात आले आहे. 

तांत्रिक चुकांमुळे ३ हजार ५२३ अर्ज नामंजूर
सौर पंपासाठी रोतकऱ्याना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यासाठी तो अर्ज अचुक असणे आवश्यक असते. तसेच अर्ज भरतांना त्यामध्ये एकरात शेती लिहीणे आवश्यक असताना हेक्टरमध्ये टाकतात. त्यामुळे, ७ हजार ७,४१९ पैकी ३ हजार ५२३ शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: One and a half thousand farmers in Buldana district are waiting for another agricultural pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.