दीड हजार ग्रामपंचायत कर्मचारी वेतनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 07:55 PM2017-10-04T19:55:09+5:302017-10-04T19:56:25+5:30
बुलडाणा : ग्रामपातळीवर पाणीपुरवठा व सफाई आदी कामे करणारे जवळपास दीड हजार ग्रामपंचायत कर्मचारी मागील ६ महिन्यापासून वेतनापासून वंचित आहेत. याशिवाय त्यांना राहणीमान भत्ता व बोनस देण्यात येत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची उपासमार सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ग्रामपातळीवर पाणीपुरवठा व सफाई आदी कामे करणारे जवळपास दीड हजार ग्रामपंचायत कर्मचारी मागील ६ महिन्यापासून वेतनापासून वंचित आहेत. याशिवाय त्यांना राहणीमान भत्ता व बोनस देण्यात येत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची उपासमार सुरू आहे.
जिल्ह्यात जवळपास दीड हजार कर्मचारी ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणे, सफाई करून स्वच्छता ठेवणे आदी कामे करतात. मात्र, कर्मचाºयांना मागील सहा महिन्यांपासून किमान वेतन वसुली अभावी मिळत नसल्यामुळे उपासमारीची वेळ ग्रा.पं.कर्मचारी यांचेसह त्यांचे कुटुंबावर आलेली आहे. तसेच त्यांना महागाई भत्ता व बोनस देण्यात येत नसल्यामुळे कुटुंबियांचे पालन पोषण कसे करावे, अशा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे. पंधरा दिवसावर दिवाळी सण आला आहे. अशा परिस्थितीत वेतनापासून वंचित कर्मचारी दिवाळी सण कसा साजरा करणार, कुटुंबियांचे पालन पोषण कसे करणार या विवंचनेत आहेत. तरी ग्रा.पं.कर्मचारी यांची दिवाळी अंधारात जावू नये व त्यांचेसह त्यांच्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ येवू नये याकरीता राहणीमान भत्त्यासह किमान वेतन दिवाळी अगोदर देवून ग्रा.पं. कर्मचाºयांना दिवाळी बोनस सुध्दा देणे आवश्यक आहे. ज्या ग्रा.पं. कर्मचाºयांना दिवाळी अगोदर किमान वेतन, राहणीमान भत्ता व दिवाळी बोनस देणार नाही, अशा ग्रा.पं. ग्रामसेवकांचे वेतन व सरपंच मानधन देण्यात येवू नये, अशी मागणी महाराष्टÑ राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर गायकी, अध्यक्ष शिवसिंग सोळंकी, जि.सचिव रामेश्वर डिवरे, जि.संघटक सुरेश सपकाळ, संघटक पी.पी.पिसे आदींनी केली आहे.
ग्रामपंचायत कर्मचाºयांना वेतनासह राहणीमान भत्ता व दिवाळी बोनस देणे आवश्यक आहे. याबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने जिल्हा परिषद, बुलडाणा यांचेसमोर आमरण उपोषण करण्यात येईल.
- रामेश्वर डिवसे, सचिव, महाराष्टÑ राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, बुलडाणा.