ज्ञानगंगा अभयारण्यात शिकार करण्यास आलेल्या एकास अटक; चार जण फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:05 AM2020-04-20T11:05:46+5:302020-04-20T11:05:56+5:30
चार आरोपी फरार झाले असून, त्यांच्या ताब्यातील शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील बोथा परिसरात शिकार करण्यासाठी आलेल्या एकास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्याची घटना रविवारी पहाटे २ वाजताच्यादरम्यान घडली. यातील चार आरोपी फरार झाले असून, त्यांच्या ताब्यातील शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
वन्यजीव विभाग अकोला अंतर्गत येणाºया खामगांव वन्यजीव परिक्षेत्रामधील बोथा वन्यजीव वर्तुळात बोथा एक बिटमध्ये रविवारला पहाटेच्या दरम्यान वन विभागाचे अधिकारी सामुहिक गस्तीवर होते. दरम्यान, शिकार करण्याच्या हेतूने आलेले काही आरोपी वन अधिकाऱ्यांना दिसून आले. दरम्यान, पाच आरोपी पैकी एक आरोपीस कुºहाड व भाल्यासह ताब्यात घेण्यात आले. वन अधिकाºयांनी रंजित सोमपाल डांगे (वय २७, रा. तरोडा) या आरोपीस पकडले व इतर चार आरोपी फरार झाले. वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ वननियमाचा भंग केल्याने त्यांचे विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर चार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. त्यांचेकडील शिकार साहित्य ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास विभागीय वनअधिकारी वन्यजीव विभाग अकोला खैरनार व वनपरिक्षेत्र अधिकारी खामगांव डांगे यांचे मार्गदर्शन खाली करण्यात येत आहे.
(प्रतिनिधी)