खूनप्रकरणी एकास अटक; दोन दिवस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:19 AM2017-07-19T00:19:08+5:302017-07-19T00:19:08+5:30

नांदुरा : येथील हेलगे नगरमध्ये राहणारे भगवंतराव गुणवंतराव देशमुख यांचा १४ जुलै रोजी खून झाला, अशी फिर्याद मृताची पत्नी पुंडाबाई भगवंतराव देशमुख हिने पोलीस स्टेशनला १६ जुलै रोजी रात्री दिली.

One arrested for murder; Police custody for two days | खूनप्रकरणी एकास अटक; दोन दिवस पोलीस कोठडी

खूनप्रकरणी एकास अटक; दोन दिवस पोलीस कोठडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : येथील हेलगे नगरमध्ये राहणारे भगवंतराव गुणवंतराव देशमुख यांचा १४ जुलै रोजी खून झाला, अशी फिर्याद मृताची पत्नी पुंडाबाई भगवंतराव देशमुख हिने पोलीस स्टेशनला १६ जुलै रोजी रात्री दिल्याने नांदुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित आनंद अशोक मंडके (वय ३२ वर्षे) रा.पंचायत समिती समोर नांदुरा यास रात्री उशिरा अटक केली.
भगवंतराव देशमुख हे काही महिन्यांपूर्वी नांदुरा येथील हेलगे नगरमध्ये राहण्यास आले होते. त्यांची पत्नी सेवानिवृत्त झाल्यामुळे मुंबई येथे मुलीकडे गेली होती. त्यामुळे भगवंतराव हे एकटेच राहत होते. दरम्यान, १४ जुलै रोजी ते मृतावस्थेत असल्याचे आढळल्याने प्रथम पोलिसांनी मर्ग दाखल करुन तपास सुरु केला. शवविच्छेदनात त्यांचा गळा आवळून व छातीवर मार असल्याने मृत्यू झाल्याचे समजले. त्यांच्या पत्नी पुंडाबाई घरी आल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला व तपास सुरु केला असता, मोबाइल दुकान चालवीत असलेला आनंद अशोक मडके यास अटक केली.
याबाबत १८ वर्षीय मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तसेच त्याच मुलीने पोलिसांना सांगितले की, मृत भगवंतराव मला त्रास देत आहे. असे आनंद मडके यास सांगितले. त्यावरुन मडके याने याबाबत मृतासोबत काही तरी झाले असेल, अशा जबाबावरुन पोलिसांनी आनंद अशोक मडके (वय ३२ वर्षे) रा.पंचायत समितीसमोर नांदुरा यास रात्री उशिरा अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता, त्यास दोन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली. येत्या दोन दिवसात पोलीस आरोपीकडून सत्य उघडकीस आणतील.

Web Title: One arrested for murder; Police custody for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.