स्वाइन फ्लूच्या आजाराने एकाचा मृत्यू!

By admin | Published: June 2, 2017 12:53 AM2017-06-02T00:53:46+5:302017-06-02T00:53:46+5:30

लोणार : स्वाइन फ्लू या प्राणघातक आजाराने तालुक्यातील रायगाव येथील काशिनाथ नामदेव नागरे (वय ५२ वर्षे) यांचा औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना ३१ मे रोजी मृत्यू झाला.

One death of swine flu | स्वाइन फ्लूच्या आजाराने एकाचा मृत्यू!

स्वाइन फ्लूच्या आजाराने एकाचा मृत्यू!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : स्वाइन फ्लू या प्राणघातक आजाराने तालुक्यातील रायगाव येथील काशिनाथ नामदेव नागरे (वय ५२ वर्षे) यांचा औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना ३१ मे रोजी मृत्यू झाला.
काशिनाथ नामदेव नागरे आजारी असल्यामुळे त्यांना प्रथम लोणार येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु आजार दुरुस्त न झाल्यामुळे त्यांना मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागरे यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना नागरे यांचा मृत्यू झाला. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनंत पबितवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगेश सानप व त्यांची चमू गावात पोहोचली. त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी केली असता, कोणीही तापाने व संशयित आढळून आले नाही. यामुळे त्यांनी माहिती घेतली असता, मृत काशिनाथ नागरे यांना प्रवासादरम्यान स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाची चमू रायगाव येथे तळ ठोकून असल्याचे डॉ. अनंत पबितवार यांनी सांगितले.

रायगाव येथे आम्ही सकाळीच जाऊन भेट देऊन गावाची पाहणी करत ग्रामस्थांची तपासणी मोहीम राबविली आहे. तरी घरात कोणी आजारी असल्यास त्वरित रुग्णालयात दाखवून उपचार घ्यावेत.
- डॉ. अनंत पबितवार, तालुका आरोग्य अधिकारी.

Web Title: One death of swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.