शेतकऱ्यांसाठी एक रकमी कर्ज मुक्ती याेजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:28 AM2021-01-09T04:28:55+5:302021-01-09T04:28:55+5:30

बैठकीत राजेश कुळकर्णी क्षेत्रीय कार्यालय, अकाेला यांनी राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना राज्य शासनाने एकवेळ समझोता याेजना (ओटीएस) घाेषित केली हाेती. ...

One Debt Relief Scheme for Farmers | शेतकऱ्यांसाठी एक रकमी कर्ज मुक्ती याेजना

शेतकऱ्यांसाठी एक रकमी कर्ज मुक्ती याेजना

Next

बैठकीत राजेश कुळकर्णी क्षेत्रीय कार्यालय, अकाेला यांनी राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना राज्य शासनाने एकवेळ समझोता याेजना (ओटीएस) घाेषित केली हाेती. अशाच प्रकारची एकरकमी समझाेता याेजना भारतीय स्टेट बॅंकेने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा विचार करून भारतीय स्टेट बॅंकेने तडजाेड करून संकटात सापडलेला शेतकरी कर्जमुक्त हाेण्याची एक संधी आहे. सदर याेजनेचा फायदा थकीत खातेदार यासाेबत थकीत असलेले शैक्षणिक, वाहनकर्ज व व्यापारी कर्जदार यांनादेखील या याेजनेचा लाभ घेता येईल. या याेजनेत थकीत व्याजात ९० टक्के, १०० टक्केपर्यंत सूट देण्यात येऊ शकते. ही याेजना मर्यादित कालावधीसाठी आहे. जे शेतकरी थकीत आहे त्यांनी आपल्या शाखेशी संपर्क करावा व कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन यावेळी केले. याप्रसंगी शाखा व्यवस्थापक सुनील शिंदे, रूपेश खंडारे, राहुल चिर्डे, हर्षल वानेरे, अविनाश बारशे, हरिभाऊ सिनकर, किरण उगले, नारायण सिनकर, देवीदास साळवे, पंडित सावळे, संभाजी देशमुख, सुरेश देशमुख, संजय देशमुख, गजानन निकम, बाबुराव हागे, सारंगधर भगत आदींची उपस्थिती हाेती.

Web Title: One Debt Relief Scheme for Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.