चिखली येथील एकाचा मृत्यू, ४४ नवे पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:37 AM2021-02-05T08:37:17+5:302021-02-05T08:37:17+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून संभाजीनगर चिखली येथील ३५ वर्षीय रुग्णाचा २७ जानेवारी राेजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून संभाजीनगर चिखली येथील ३५ वर्षीय रुग्णाचा २७ जानेवारी राेजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ४४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. १ हजार ६२५ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले असून ८९ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १ हजार ७०९ अहवाल बुधवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी १ हजार ६२५ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ४४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चिखली शहरातील आठ, चिखली तालुका अंत्री खेडेकर १, मुंगसरी १, चांधई १, खामगांव तालुका जळका भडंग १, मेहकर शहरातील ११, बुलडाणा शहरातील १०, मोताळा तालुका परडा १, मोताळा शहर १, नांदुरा तालुका अंभोडा १, जवळा १, संग्रामपूर तालुका सोनाळा १, दे. राजा शहर २, दे. राजा तालुका दे. मही २, जळगांव जामोद शहर १, मूळ पत्ता जाफ्राबाद जि. जालना येथील १ संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. काेराेनावर मात केल्याने बुलडाणा येथील आठ , सिद्धिविनायक हॉस्पिटल १७, स्त्री रुग्णालय ५, अपंग विद्यालय ११, मलकापूर ८, दे. राजा ९, लोणार १, मेहकर २, खामगांव १७, मोताळा ३, चिखली येथील ८ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत १ लाख ५ हजार १३९ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १३ हजार ३३२ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच २०७२ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार ७४५ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १३ हजार ३३२ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात २४६ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १६७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.