विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

By सदानंद सिरसाट | Published: June 15, 2024 07:28 PM2024-06-15T19:28:44+5:302024-06-15T19:29:16+5:30

रात्री झालेल्या पावसामुळे विजेचा शॉक लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

one died due to electric shock | विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

सदानंद सिरसाट, खामगाव, जि.बुलढाणा, मलकापूर : विजेचा जबर शॉक लागून ४८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. येथील उपजिल्हा रुग्णालयानजीक शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रात्री झालेल्या पावसामुळे विजेचा शॉक लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उपजिल्हा रुग्णालयानजीकच्या रस्त्यावर असलेल्या पवन टायर्स सर्व्हिसेसचे संचालक सुनील किसन ठोसर (४८) हे नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी वाहनांमध्ये हवा भरण्यासाठी वापरण्यात येणारे कॉम्प्रेसर लावण्यासाठी गेले होते. विजेचे बटन दाबताना त्यांना विजेचा जबर शॉक बसला. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या हालचाली मंदावल्या. हा प्रकार त्यांच्या दुकानासमोरील लॉंड्रीचालकाच्या लक्षात आला. त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे लोक जमा झाले. जखमी अवस्थेत ठोसर यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, त्या आधीच प्राणज्योत मालवल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गत सप्ताहात झालेल्या पावसामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊन ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Web Title: one died due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज