कोरोनामुळे मोताळा येथील एकाचा मृत्यू, ११० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 11:11 AM2021-02-15T11:11:31+5:302021-02-15T11:11:41+5:30
CoronaVirus in Buldhana ३८७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ११० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५०४ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३८७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ११० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान मोताळा येथील एकाचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.
पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये चिखली २७, हातनी दोन, कोलारा एक, अंत्रीकोळी एक, अमडापूर तीन, अंचरवाडी दोन, खंडाळा दोन, भोकरवाडी एक, जांभोरा एक, पाटोदा एक, भालगाव दोन, देऊळगाव राजा नऊ, सिनगाव जहागीर दोन, डोढ्रा एक, गिरोली बुद्रूक एक, साखरखेर्डा तीन, सिंदखेड राजा एक, अंजनी खुर्द एक, अजीसपूर एक, बुलडाणा २४, वाडी एक, खामगाव दहा, मलकापूर एक, मोरखेड एक, लासुरा एक, मुर्ती एक, लाखनवाडा सुटाळा दोन, सुटाळा एक, हिवरखेड खू एक, नांदुरा दोन, पिंप्री अढाव एक, आणि जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील धावडा येथील एक तथा जळगाव जिल्ह्यातील एकाचा यात समावेश आहे. दरम्यान, मोताळा येथील ६३ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे ४६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना कोवडी केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या १४ हजार ११५ जणांना रुग्णालयातून आतापर्यंत सुटी देण्यात आली आहे.