आमखेड येथील एकाचा मृत्यू, ४४ नवे पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:31 AM2021-01-18T04:31:34+5:302021-01-18T04:31:34+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून रविवारी चिखली तालुक्यातील आमखेड येथील ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ...

One dies at Amkhed, 44 new positive | आमखेड येथील एकाचा मृत्यू, ४४ नवे पाॅझिटिव्ह

आमखेड येथील एकाचा मृत्यू, ४४ नवे पाॅझिटिव्ह

Next

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून रविवारी चिखली तालुक्यातील आमखेड येथील ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ४४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. २८४ काेराेना अहवाल निगेटिव्ह असून ५५ जणांनी काेराेनावर मात केली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३२८ अहवाल रविवारी प्राप्त झाले आहेत. पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील तीन, बुलडाणा तालुक्यातील कोलवड १, चिखली शहरातील एक, चिखली तालुक्यातील पेनसावंगी १, मोताळा तालुक्यातील तरोडा १, लिहा २, कोथळी १, किन्होला १, मोताळा शहरातील पाच, शेगाव शहरातील ११, शेगाव तालुका पळशी १, मानेगाव १, गव्हाण १, जानोरी १, नांदुरा शहर १, मलकापूर शहरातील दाेन, मलकापूर तालुका जांबुळधाबा १, संग्रामपूर तालुका काकन वाडा १, जळगाव जामोद तालुका मालखेड २, जळगाव जामोद शहरातील ४, सिंदखेड राजा शहरातील दाेघांचा समावेश आहे. तसेच काेराेनावर मात केल्याने दे. राजा येथील चार, खामगाव १२, बुलडाणा अपंग विद्यालय १५, स्त्री रुग्णालय १, शेगाव १०, सिंदखेड राजा ४, जळगाव जामोद १, नांदुरा २, चिखली येथील सहा जणांना सुटी देण्यात आली आहे.

आतापर्यंत १५९ जणांचा मृत्यू

तसेच आजपर्यंत ९६ हजार ९६० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच ५९६ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार ३११ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १२ हजार ८१३ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३३९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १५९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली आहे.

Web Title: One dies at Amkhed, 44 new positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.