कोरोनामुळे एकाचा मृत्य, ७३ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:08+5:302021-06-24T04:24:08+5:30
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील १०, खामगाव नऊ, शेगाव चार, देऊळगाव राजा ११, चिखली ९, मेहकर आठ, मलकापूर तीन, ...
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील १०, खामगाव नऊ, शेगाव चार, देऊळगाव राजा ११, चिखली ९, मेहकर आठ, मलकापूर तीन, लोणार ११, जळगाव जामोद चार, सिंदखेड राजा दोन आणि संग्रामपूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. नांदुरा व मोताळा तालुक्यातील संदिग्धांपैकी एकही जण तपासणीमध्ये कोरोना बाधित आढळून आला नाही. दुसरीकडे कोरोनामुळे मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथील ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, ५४ जणांनी बुधवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ५४ हजार ८९१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ८५ हजार ६३२ बाधितांनी आतापर्यंत कोरानावर मात केली आहे.
--१५३८ अहवालाची प्रतीक्षा--
तपासणीसाठी घेतलेल्या १ हजार ५३८ संदिग्धांच्या अहवालाची अद्यापही प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची ८६ हजार ४०६ झाली आहे. सध्या रुग्णालयात ११८ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात ६५६ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.