कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:42 AM2018-12-19T00:42:08+5:302018-12-19T00:42:19+5:30
अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मेव्हणीच्या विवाह समारंभासाठी मुंबईहून नाशिकला येत असताना मुंबई महामार्गावरील अंबड औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीसमोर कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़१८) सकाळच्या सुमारास घडली़
सिडको : अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मेव्हणीच्या विवाह समारंभासाठी मुंबईहून नाशिकला येत असताना मुंबई महामार्गावरील अंबड औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीसमोर कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़१८) सकाळच्या सुमारास घडली़ जयंत आनंदराव डोंगरे (३५, रा. श्रीदर्शन सोसायटी, वाशी, मुंबई) असे अपघातातमृत्यू झालेल्या कारचालकाचे नाव असून, माजी नगरसेवक डॉ़ सुचेता बच्छाव यांचे ते जावई आहे़ अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयंत डोंगरे यांची मेव्हणी व माजी नगरसेवक डॉ़ सुचेता बच्छाव यांच्या मुलीचा शुक्रवारी (दि़२१) विवाह समारंभ असल्याने त्यांचे जावई जयंत डोंगरे हे आपल्या साथीदारासह मंगळवारी सकाळी मुंबईहून कारने (एमएच-१५, बीएस-७१६७) नाशिकला येत होते़ मुंबई महामार्गावरील अंबड औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीसमोर त्यांच्या कारचे टायर फुटले व डोंगरे यांचे कारवरील नियंत्रण सुटून ती दुभाजकावर जाऊन आदळली़ या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या डोंगर यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ मयत डोंगरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम शेळके करीत आहेत.