खामगाव-शेगाव रोडवर कार अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 11:58 IST2020-06-02T11:57:10+5:302020-06-02T11:58:48+5:30
रमेश विठ्ठल बढे आपल्या एका सहकाऱ्यासह शेगाव येथे जात होते.

खामगाव-शेगाव रोडवर कार अपघातात एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३.३० दरम्यान खामगाव-शेगाव रोडवरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर घडली.
खामगाव शहरातील मोदी ले-आऊट भूत बंगला परिसरातील रमेश विठ्ठल बढे आपल्या एका सहकाऱ्यासह शेगाव येथे जात होते. त्यावेळी चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटल्याने अनियंत्रित झालेली कार रोडपासून १५ ते २० फूट अंतरावर जाऊन उलटली. या अपघातात कार मधील रमेश विठ्ठल बढे जागीच ठार झाले. तर त्यांचा एक सहकारी शाहीद गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमीला खामगाव येथील उप जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले.
युवकाचा अपघातात मृत्यू
मलकापूर : तिर्घ्यातील शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर करीत असतांना २४ वर्षीय तरुणाचा मुत्यू झाला. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तिर्घ्यात अनिल पर्वत सोळंके यांच्या शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर चालविण्यासाठी चरण अरुण शिंदे (२४) हा गेला होता. त्यावेळी शेतमालकासह तीन जण धुºयावर बसून होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास रोटावेटर बंद पडले. ते दुरुस्त करण्यासाठी शिंदे ट्रँक्टर बंद करून खाली उतरला. रोटावेटरवर तो आदळल्याने त्याचा मृत्यू झाला.