भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठार, खामगाव-अकोला रोडवरील घटना

By अनिल गवई | Published: October 15, 2022 04:34 PM2022-10-15T16:34:57+5:302022-10-15T16:35:55+5:30

कामावरून परततान घडली घटना.

One killed in collision with speeding goods vehicle incident on Khamgaon Akola road | भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठार, खामगाव-अकोला रोडवरील घटना

भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठार, खामगाव-अकोला रोडवरील घटना

googlenewsNext

खामगाव: भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. शनिवारी दुपारी १२:३० वाजता ही घटना खामगाव-अकोला रोडवर घडली.

सुनिल भिकाजी आटोळे (५३, रा. बाळापूर फैल) असे मृतक इसमाचे नाव आहे. बाळापूर रोडवरील एका कार सजावट साहित्याच्या दुकानावर वॉचमन म्हणून कर्तव्य बजावत असलेले आटोळे  शनिवारी दुपारी १२:३० वाजता  जेवण आटोपून कामावर परतत होते. त्याचवेळी  भरधाव मालवाहू वाहनाने त्यांना चिरडले. या घटनेनंतर भरधाव मालवाहू वाहन अकोलाच्या दिशेने निघून गेले.

या अपघातानंतर जखमी अवस्थेत सुनिल आटोळे यांना सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी आटोळे यांना मृत घोषित केले. घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सीसी फुटेजच्या आधारे पोलीस अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेत आहेत.

Web Title: One killed in collision with speeding goods vehicle incident on Khamgaon Akola road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.