मोटारसायकल अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 17:32 IST2019-09-16T17:32:31+5:302019-09-16T17:32:37+5:30
दुचाकीची झाडाला जबर धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना कणका-वरूड रोडवर सोमवारी सकाळी उघडकीस आली.

मोटारसायकल अपघातात एक ठार
डोणगाव : दुचाकीची झाडाला जबर धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना कणका-वरूड रोडवर सोमवारी सकाळी उघडकीस आली.
वरुड येथील उपसरपंच विष्णू मांगीलाल राठोड (वय ४०) हे काही कामानिमित्त १५ सप्टेंबर रोजी रात्री अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील पांगरताटी येथे दुचाकीने जात होते. दरम्यान, वळण रस्ता असल्याने रस्त्याच्या कडेलाच बाभळीच्या झाडावर दुचाकी आदळली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कणका येथील शेतकरी गुलाब भंडारे ह १६ सप्टेंबर रोजी सकाळी शेतात जात असताना त्यांना अपघात झाल्याचे निर्दशनास आले. त्यांनी कणका येथील तंटामुक्ती अध्यक्ष यांना फोन करुन सांगितले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. मृतक विष्णू राठोड यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ, दोन बहीणी, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी डोणगाव पोलिस स्टेशनमध्ये कलम २७९, ३०४ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन धोडगे व राजू जाधव करीत आहेत.