दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 10:59 PM2017-09-29T22:59:45+5:302017-09-29T23:03:05+5:30
चिखली : तालुक्यातील भरोसा येथून चिखली शहराकडे येणा-या तरूणांच्या दुचाकीस एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २८ सप्टेंबरच्या रात्री १ वाजेच्या सुमारास चिखली-जालना महामार्गावरील बेराळा फाट्यावर घडली. या अपघातात रविंद्र शिवाजी थूटटे वय वर्ष २६ हा जागीच ठार झाला तर अमोल अनिल गायकवाड हा गंभीर जखमी झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

भरोसा येथील रविंद्र शिवाजी थुट्टे व अमोल अनिल गायकवाड हे दोघे दिवसभर शेतात सोयाबीन सोंगन्या साठी गेले होते. सायंकाळी घरी आल्यावर काही खाजगी कामासाठी स्वत:ची मोटार सायकल क्रमांक एमएच २८ ए-५०७४ ने चिखलीला गेले होते. चिखली वरून रात्री उशीरा घराकडे परत येत असताना बेराळा फाटा नजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेने रविंद्र शिवाजी थुट्टे हा घटना स्थळीच मृत्यमुखी पडला तर अमोल अनिल गायकवाड हा गंभीररित्या जखमी झाला. रात्रीची वेळ असल्यामुळे घटनास्थळावर एक ते दीड तास कोणीही आले नाही. दरम्यान पप्पू पवार हे आपल्या कुटुंबांसमवेत तुळजापूरच्या दर्शांवरून घरी येत असताना त्यांनी या मोटार सायकलस्वारांच्या गंभीर अवस्थेबाबत नगरसेवक गोपाल देव्हडे व नामु गुरूदासानी यांना फोनवरून माहिती दिल्यानंतर देव्हडे, गुरूदासानी यांच्यासह रमजान चौधरी, आकाश गाडेकर, नवीन आहुजा, बबलू मेमन, बबलू शेख आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमींना चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात भरती केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.