जीप व दुचाकीच्या अपघातात एक ठार, एक गंभीर; बुलडाणामधील नांदूरा भागातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 23:11 IST2021-10-14T23:10:54+5:302021-10-14T23:11:08+5:30
एम .एच. २८ सी ६४७० क्रमांकाची जीप व दुचाकी क्र . एम. एच. २८ बि. जि.५५१९ क्रमांकाच्या दुचाकीमध्ये धडक झाली.

जीप व दुचाकीच्या अपघातात एक ठार, एक गंभीर; बुलडाणामधील नांदूरा भागातील घटना
नांदुरा : नांदुरा ते जळगाव जामोद मार्गावर निमगाव फाट्याजवळ जीप व दुचाकीच्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना १४ आॅक्टोबरच्या रात्री नऊ वाजताच्यादरम्यान घडली.
एम .एच. २८ सी ६४७० क्रमांकाची जीप व दुचाकी क्र . एम. एच. २८ बि. जि.५५१९ क्रमांकाच्या दुचाकीमध्ये धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील जळगाव जामोद येथील जहीर खान मुमताज खान (वय ३२) या युवकाचा मृत्यु झाला तर अरबाज बेग अजीज बेग (वय २०) गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी अकोला पाठविण्यात आले आहे. अपघातातील जीप ही पोलिस विभागातील असल्याची चर्चा अपघातस्थळी होती. उशिरा रात्रीपर्यंत या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नांदुरा पोलिस स्टेशनला सुरू होती.