धाड-धामणगाव रस्त्यावर अपघातात १ ठार; ३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 04:34 PM2018-06-18T16:34:19+5:302018-06-18T16:34:19+5:30
धाड : भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने समोरुन येणाऱ्या अॅपेस धडक देऊन घडलेल्या अपघातात अॅपेमधील १ जण जागीच ठार तर ३ जण जखमी झाल्याची घटना १७ जून रोजी रात्री १० वाजता धाड-धामणगाव रस्त्यावरील १३२ वीज उपकेंद्रानजीक घडली.
धाड : भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने समोरुन येणाऱ्या अॅपेस धडक देऊन घडलेल्या अपघातात अॅपेमधील १ जण जागीच ठार तर ३ जण जखमी झाल्याची घटना १७ जून रोजी रात्री १० वाजता धाड-धामणगाव रस्त्यावरील १३२ वीज उपकेंद्रानजीक घडली. मराठवाड्यातील ग्राम सुरंगळी ता.भोकरदन येथील काही युवक शेगाव येथून गावी परतत असताना धाडनजीक १३२ वीज उपकेंद्रानजीक धामणगाव रस्त्यायवर हा अपघात घडला. यातील तरुण हे अॅपे क्रमांक एमएच २०- बीए ४४६७ मधून प्रवास करीत होते. तर समोरुन येणाºया ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३७ - ए ६५८१ भरधाव वेगात धडक दिली. या घटनेत शे.शेहबाज शे.उबाब (वय १८) हा युवक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला तर शे.रईस शे.अजीस (वय २५), शे.शहारुख शे.नवाब (वय १८), शे.अरबाज शे.रुबाब( वय १६) हे तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालय धाड येथे उपचारार्थ दाखल केले तर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारार्थ बुलडाणा येथे रवाना केले. घटनास्थळावरुन ट्रॅक्टर चालकाने पळ काढल्याने नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या तीन तासातच सदर अपघातातील ट्रॅक्टर जप्त केला. आज या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु होती. तर ट्रॅक्टर चालकास वृत्त लिहिस्तोवर अटक झालेली नव्हती. या प्रकरणी अधिक तपास पीएसओ संग्राम पाटील व त्यांचे सहकारी करीत आहे.