लसीकरण पूर्ण करणाऱ्या पालिका, ग्रामपंचायतींना एक लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:29+5:302021-04-05T04:30:29+5:30
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. दरम्यान, लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. परंतु नागरिकांमध्ये लसीकरणासाठी ...
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. दरम्यान, लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. परंतु नागरिकांमध्ये लसीकरणासाठी पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. लसीकरण वाढविण्याच्या अनुषंगाने माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी जनजागृती केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता जिल्ह्यात
नियमानुसार जनतेने लस घेणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जी नगरपरिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत व गट ग्रमपंचायत १०० टक्के लसीकरण करून घेईल, त्यास सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विकासाकरीता प्रोत्साहनपर चेकच्या माध्यमातून नगदी रोख १ लाख रुपयांची धनराशी देण्यात येणार आहे. सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राहुल सावजी आहेत. यासंदर्भात सुबोध सावजी यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांना कळविले आहे.