मालवाहू आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 14:56 IST2024-06-25T14:55:36+5:302024-06-25T14:56:54+5:30
खामगाव शेगाव रोडवरील घटना.

मालवाहू आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
अनिल गवई, खामगाव: मालवाहू जीप आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तर अनियंत्रित झालेली मालवाहू जीप उलटली. खामगाव शेगाव रोडवरील एका हॉटेलजवळ सोमवारी उशिरारात्री ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, घाटपुरी येथील ज्ञानेश्वर सहदेव महाले ४० आणि त्यांची पत्नी सोमवारी रात्री दुचाकीने लासूरा येथून खामगावकडे येत होते. दरम्यान, एका हॉटेल जवळ दुचाकी आणि मालवाहू जीप मध्ये धडक झाली. यात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर महाले यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते जखमी झाले. तर जीप अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटली. अपघातानंतर प्रत्यक्षदर्शीनी महाले यांना तात्काळ खामगाव येथील उप जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आल्याचे सामान्य रूग्णालयातील सुत्रांनी सांगितले.