‘एक चहा देशासाठी, अनाथांच्या भल्यासाठी!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:32 PM2017-08-13T23:32:45+5:302017-08-13T23:39:21+5:30
चिखली: छत्रछाया हय़ुमन डेव्हलपमेंट फाउंडेशनद्वारा संचालित नंदनवन परिवारच्या मदतीसाठी एक चहा देशासाठी, अनाथांच्या भल्यासाठी अभिनव उपक्रम ९ ते १५ ऑगस्टदरम्यान राबवून नागरिकांकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

नंदनवन परिवार हा साखळी बु. जिल्हा बुलडाणा येथील विक्रम दरा खे यांच्या शेतात सुरू करण्यात आला असून, याद्वारे अनाथ, निराधार गरजू व होतकरू मुले, आत्महत्या केलेल्या शेतकर्यांची मुले, अ पघाताने निराo्रित झालेली मुले व भीक मागणारी अनाथ मुलांच्या अन्न, वस्त्र निवारा आरोग्य, संरक्षण, नोकरी व व्यवसायाच्या माध्यमा तून स्वावलंबी बनविणे यासाठी कार्यरत आहे.
या उपक्रमासाठी समाजातील सहृदय व दानशूर व्यक्तींकडून आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी ‘एक चहा देशासाठी, अनाथांच्या भल्यासाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना एक कप चहा देऊन उपक्रमाची माहिती देण्यात येते व दानशूर व्यक्तीकडून आर्थिक सहाय्य मिळविण्यात येते.
या उपक्रमास प्राचार्य नीलेश गावंडे, सुनील मोडेकर, श्वेता महाले, विजयकुमार कोठारी, शरदसेठ भाला, डॉ. सत्येंद्र भुसारी, विष्णू कुळसुंदर, शैलेश बाहेती व तहसील कर्मचारी व विविध मान्यवरांनी भेट देऊन भरीव आर्थिक सहाय्य केले आहे.
-