पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एकाने केले विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:34+5:302021-06-09T04:42:34+5:30

अमडापूर येथील श्याम राऊत व त्यांचे भाऊ गजानन राऊत यांचा त्यांच्या भाऊबंधांशी मार्च महिन्यात वाद झाला होता. याप्रकरणात परस्पर ...

One of them got fed up with the police and administered poison | पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एकाने केले विष प्राशन

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एकाने केले विष प्राशन

Next

अमडापूर येथील श्याम राऊत व त्यांचे भाऊ गजानन राऊत यांचा त्यांच्या भाऊबंधांशी मार्च महिन्यात वाद झाला होता. याप्रकरणात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात श्याम राऊत यास अमडापूर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी श्याम राऊत यांनी ७ जून रोजी सायंकाळी अमडापूर पोलिस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले होते. दरम्यान हे उपोषण ठाणेदार अमित वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दमदाटी करून मोडीत काढल्याचा आरोप विषय प्राशन करणाऱ्या श्याम राऊत यांचे भाऊ गजानन राऊत केले आहे. सध्या श्याम राऊतवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

--दोन पोलिसांना कारणे दाखवा नोटीस--

मार्च महिन्यातील या घटनेप्रकरणी एसडीपीओ रमेश बरकते यांनी चौकशी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे बिट बदललेले आहेत. सोबतच संबंधितांना त्यांची एक वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीसही बजावलेली आहे.

--दोषींवर कारवाई करणार--

मार्च महिन्यातील प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. सोबतच ७ जून रोजी घडलेल्या प्रकारासंदर्भातही चौकशी करून त्यात जर पोलिस कर्मचारी दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच मार्च महिन्यातील प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावे असे पोलिसांनी उपोषणकर्त्यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले व तसे लेखीही पोलिसांना दिले असल्याचे चावरिया म्हणाले.

--ठाणेदारांची बदली--

अमडापूरचे ठाणेदार अमित वानखेडे यांची बुलडाणा येथे जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. कौटुंबिक कारणावरून त्यांनी बदली करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरियांनी दिली. दरम्यान, त्यांच्या जागी अमडापूरचा प्रभारी पदभार एलसीबीचे एपीआय नागेशकुमार चतरकर यांच्याकडे देण्यात आला असल्याची माहिती आहे.

Web Title: One of them got fed up with the police and administered poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.