अमडापूर प्राथमिक केंद्राअंतर्गत एक हजारावर नागरिकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:23+5:302021-03-29T04:20:23+5:30
अमडापूर : स्थानिक प्राथमिक केंद्रातंर्गत १७ दिवसांच्या कमी कालावधीत १०८७ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत ...
अमडापूर : स्थानिक प्राथमिक केंद्रातंर्गत १७ दिवसांच्या कमी कालावधीत १०८७ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत आरोग्य विभागाकडून अमडापूर प्राथमिक केंद्रातंर्गत १० मार्चपासून नि:शुल्क कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. अमडापूर व परिसरातील ६० वर्षांवरील वरील तसेच दुर्धर आजार असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, सर्व नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येण्या-जाण्यासाठी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज चिखली बससेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी नागरिकांनी स्वत: आणि इतरांचे लसीकरण करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा खरात, डॉ. देवेंद्र बावस्कर यांनी केले आहे.
लसीचे दुष्परिणाम नाहीत
अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत गत १७ दिवसांत १०८७ नागरिकांनी कोरोनाचे लसीकरण केले. यामध्ये कोणत्याही नागरिकास प्रतिक्रिया आढळून आल्या नाहीत. तेव्हा नागरिकांनी घाबरून न जाता या जीवनरक्षक लसींचे दोन डोस पूर्ण करावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केले आहे.