एक हजार झाडांचे केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:36 AM2021-07-27T04:36:21+5:302021-07-27T04:36:21+5:30

जानेफळ: काळाची गरज ओळखून वृक्ष लागवडीचा संदेश देत येथील माजी सरपंच डॉ. सतीश कुळकर्णी यांनी .२४ जुलै रोजी ...

One thousand trees were allotted | एक हजार झाडांचे केले वाटप

एक हजार झाडांचे केले वाटप

Next

जानेफळ: काळाची गरज ओळखून वृक्ष लागवडीचा संदेश देत येथील माजी सरपंच डॉ. सतीश कुळकर्णी यांनी .२४ जुलै रोजी विविध जातींच्या १ हजार झाडांचे वाटप केले आहे. यामुळे त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन ही चिंतेची बाब बनलेली आहे. सध्या सुरू असलेली वृक्षतोड आणि त्या मानाने नव्याने होणाऱ्या वृक्ष लागवडीचे प्रमाण फारच अल्प आहे़ त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे. याचा मानवी जीवनावर सुद्धा मोठा परिणाम होत असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष केल्या जात आहे. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे बनले आहे आणि वृक्ष लागवडी सोबतच त्याचे संगोपन करणे सुद्धा गरजेचे आहे़ त्यामुळे गावात वृक्षलागवडीची चळवळ निर्माण व्हावी या उद्देशाने पर्यावरण प्रेमी डॉ. सतीश कुळकर्णी यांनी शनिवार दिनांक २४ जुलै २०२१ रोजी एक कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश कुळकर्णी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेहकर शहराचे माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर,रयत क्रांती संघटनेचे ॲड. जितू अडेलकर, ग्रा.पं. सदस्य सय्यद महेबूब, विक्रम मेहुणकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी शैलेश कुळकर्णी, भानुदास सराफ, गजानन क्षीरसागर, सुभाष वाळके, राम शेळके, गणेश सवडतकर, सचिन राजूरकर, विशाल फितवे, संतोष बोरबळे, परशराम डोंगरे, सचिन वाळके, अरुण लाहोटी, विजय केदारे, राजू केदारे, श्याम सदावर्ते, ज्ञानेश्वर शेवाळे, अमोल सुरजुसे, दीपक इंगळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

वृक्ष लागवडीची चळवळ हवी

यावेळी गावात वृक्ष लागवडीची चळवळ निर्माण करण्याची गरज तसेच वृक्ष लागवडीचे फायदे व वाढत्या वृक्षतोडीमुळे होत असलेले दुष्परिणाम याबाबत मान्यवर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडून त्यानंतर ट्रॅक्टरमधून गावात वड, पिंपळ, निम, चिंच इत्यादी झाडांचे वाटप करण्यात आले.

Web Title: One thousand trees were allotted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.