निकृष्ट पालखी मार्गासाठी सुरू असलेले उपोषण नवव्य दिवशी सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:42 AM2021-09-10T04:42:05+5:302021-09-10T04:42:05+5:30
मेहकर व तालुक्यातील पंढरपूर ते शेगाव पालखी मार्गाचे निकृष्ट सुरू असलेल्या कामासंबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या कामाचे विरोधात ...
मेहकर व तालुक्यातील पंढरपूर ते शेगाव पालखी मार्गाचे निकृष्ट सुरू असलेल्या कामासंबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या कामाचे विरोधात सामाजिक कार्यकर्ता विजय पवार यांनी १ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला ९ दिवस पूर्ण झाले होते. गुरुवारी या उपोषणाला खामगांव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर, संजय शिंनगारे यांनी भेट दिली. उपविभागीय अधिकारी गणेश राठोड व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे मुख्य अभियंता उदय बरडे यांच्या उपस्थितीत मेहकर व तालुक्यातील पालखी मार्गाचे गणपती विसर्जन नंतर लगेच अतिक्रमण काढून बाकी असलेली रस्त्याची सर्व अर्धवट कामे पूर्ण करण्या बाबत उपोषणकर्त्याला लेखी पत्र दिले. अतिक्रमण पूर्ण काढून त्या ठिकाणी संबंधित विभागाला अजून निधी मागून डिवाइडर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्रवासी निवारे, पेवर ब्लॉक बसविण्यात येतील या आश्वासनानंतर विजय पवार यांनी उपोषण मागे घेतले. मात्र आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही व भविष्यात एखादा अपघात घडला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला संबंधित विभागाने एक कोटी रु. नुकसान भरपाई देणे अन्यथा याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन परत करू असे आंदोलनकर्त्या यावेळी सांगितले.