कांदे,बटाट्यांचे दर गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 11:59 AM2020-10-28T11:59:49+5:302020-10-28T11:59:59+5:30
Onions and potatoes price rise बटाटे ४० रूपयांहून ५० रूपये तर लाल कांदे ६० तर पांढरे कांदे ८० रूपये प्रती किलो दराने विकत आहेत.
खामगाव : गत दोन महिन्यांपासून भाजीपाल्यांच्या दरात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. त्यातच ऐन दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कांदे आणि बटाट्याचे दर चांगलेच वाढले आहेत. बटाटे ४० रूपयांहून ५० रूपये तर लाल कांदे ६० तर पांढरे कांदे ८० रूपये प्रती किलो दराने विकत आहेत. शहरात जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रासह अन्य जिल्ह्यातून भाजीपाल्यांची आवक होत असते.
विशेषतः हिवाळा ऋतुच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण क्षेत्रातून भाजीपाल्यांची आवक वाढत आहे. कोरोना काळात भाजीपालासह किराणा साहित्यांच्या किमतीत वाढ झाल्याचेच दिसून येत आहे. पंधरवड्यापूर्वी भाजीपालासह किराणा साहित्याच्या दरात थोडीफार दरात तफावत दिसून येते.
मात्र ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा महागाईने जनसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडविले आहे. बटाटे, कांदे, फूल कोबी, पत्ताकोबी, वांगे, भरतीचे वांगे, शिमला मिरची, वालाच्या शेंगाच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते.