बँक खात्यावर आॅनलाइन दरोडा; १ लाख ३२ हजार रुपये काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 03:00 PM2019-05-07T15:00:13+5:302019-05-07T15:00:21+5:30

बिबी: भारतीय स्टेट बँकेच्या बिबी येथील शाखेतील ग्राहकांच्या खात्यातून १ लाख ३१ हजार ५०० रुपयांची रक्कम परस्पर इतर खात्यावर वळवून काढून घेतल्याची घटना ५ व ६ मे च्या मध्यरात्री दरम्यान घडली.

Online burglary on bank account; Removed 1 lakh 32 thousand rupees | बँक खात्यावर आॅनलाइन दरोडा; १ लाख ३२ हजार रुपये काढले

बँक खात्यावर आॅनलाइन दरोडा; १ लाख ३२ हजार रुपये काढले

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बिबी: भारतीय स्टेट बँकेच्या बिबी येथील शाखेतील ग्राहकांच्या खात्यातून १ लाख ३१ हजार ५०० रुपयांची रक्कम परस्पर इतर खात्यावर वळवून काढून घेतल्याची घटना ५ व ६ मे च्या मध्यरात्री दरम्यान घडली. बँक खात्यावर पडलेल्या या आॅनलाइन दरोड्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया कडे राष्ट्रीयीकृत बँक असल्यामुळे ग्राहक विश्वासाने आपले खाते या बँकेत काढतात. त्यामुळे आपल्या जवळील कोट्यवधीच्या रक्कमा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बँकेत ठेवतात. आवश्यक वेळी ते आपल्या खात्यातून देवाण-घेवाणीचा व्यवहार करतात. परंतु या आॅनलाइन व्यवहारामुळे जनतेच्या घामाच्या पैशावरच आता हॅकर आॅनलाइन दरोडे घालत आहेत. बिबी येथील स्टेट बँक शाखेच्या तीन खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून ग्राहकांना लाखो रुपयांचा चुना लावण्याचे काम हॅकर्सनी केले आहे. यासंदर्भात ग्राहकांनी बँकेचे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार मदन मोहन यांच्याकडे तक्रार केली असून, आॅनलाइन तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. तसेच बिबी पोलीस स्टेशन येथे सुद्धा तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्यात त्यांनी हॅकर्सवर योग्य ती कारवाई करून आमची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. बीबी येथील सुनंदा सिताराम साळवे व्यवसायने शिक्षिका असून त्यांच्या खात्यातून ५ मे रोजी रात्री ११.५५ वाजता २० हजार रुपये, ११.५७ वाजता ४० हजार रुपये ६ मे रोजी रात्री १२.०१ वाजता ४० हजार रुपये व १२.०३ वाजता २० हजार रुपये असे चार वेळा एटीएमद्वारे परस्पर एक लाख २० हजार रुपये काढण्यात आले आहे. तसेच वैभव श्रीधर आटोळे यांच्या खात्यातून ५ मेच्या रात्री ८.१६ वाजता दहा हजार रुपये व ८.१७ वाजता १ हजार ५०० रुपये असे दोन वेळा ११ हजार ५०० रुपये काढण्यात आले आहेत. खापरखेडा येथील घुले यांच्या खात्यातून सुद्धा १ हजार २०० रुपये काढण्यात आलेले आहेत. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Online burglary on bank account; Removed 1 lakh 32 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.