जागतिक याेग दिनानिमित्त ऑनलाईन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:23 AM2021-06-20T04:23:37+5:302021-06-20T04:23:37+5:30
सिंदखेडराजा: जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील निसर्गाई फाउंडेशनच्या माध्यमातून धरती बचाव परिवाराच्या वतीने, बाल योगी वरद जोशी यांचे एक ...
सिंदखेडराजा: जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील निसर्गाई फाउंडेशनच्या माध्यमातून धरती बचाव परिवाराच्या वतीने, बाल योगी वरद जोशी यांचे एक दिवसीय योग मार्गदर्शन शिबिराचे येथील संत सावता सभामंडपात आयोजन करण्यात आले होते.
गुरुवारी झालेल्या या योग प्रशिक्षण शिबिरात शहरातील अनेक नागरिकांनी सहभाग घेतला. भारत स्वाभिमान ट्रस्ट, पतंजली योग समिती व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या सक्रीय सहभाग घेतला़ नगरपरिषदेचे सहकार्य मिळाल्याने धरती बचाव परिवाराचे प्रमुख जनाबापू मेहेत्रे यांनी या पुढेही असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगितले. धरती बचाव अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी हजारो रोपांचे रोपण केले जाते. या वर्षीही अनेकांच्या सहभागातून वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार असल्याचे मेहेत्रे यांनी योग शिबिर कार्यक्रमात सांगितले. बाल योगी वरद जोशी यांनी योगाचे प्रशिक्षण देऊन अनेकांना योगाकडे वळविले आहे, याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष सतीश तायडे, प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांच्यासह अनेकांनी उपस्थिती होती.