नेत्यांची ऑनलाईन हायटेक इमेज बिल्डिंग

By admin | Published: September 3, 2014 10:23 PM2014-09-03T22:23:57+5:302014-09-03T22:24:38+5:30

विधानसभेच्या रणधुमाळीत बुलडाणा जिल्ह्यात ‘ऑनलाईन’ प्रचार.

Online HiTech Image Building of Leaders | नेत्यांची ऑनलाईन हायटेक इमेज बिल्डिंग

नेत्यांची ऑनलाईन हायटेक इमेज बिल्डिंग

Next

बुलडाणा: लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल नेटवर्किंगचा झालेला फायदा लक्षात घेता विधानसभेच्या रणधुमाळीतदेखील ऑनलाईन प्रचारास सुरुवात झाली आहे. अद्याप निवडणुकांच्या तारखा, पक्षांच्या याद्या याबद्दल काहीच घोषणा झालेली नसली तरी  निवडणुकांचा फिव्हर जाणवायला लागला आहे. आचारसंहिता लागू होण्याअगोदरच जनतेच्या मनात चांगली प्रतिमा प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून धडपड होताना दिसत आहे. अगदी मोठमोठय़ा नेत्यांपासून ते अगदी पहिल्यांदाच निवडणुका लढविण्याचे स्वप्न पाहणार्‍यांकडून सोशल नेटवर्किंगच्या मार्गातून ऑनलाईन इमेज बिल्डिंग साठी प्रयत्न होताना दिसत आहेत.
निवडणुका म्हटल्या की डोळ्य़ासमोर येतात ते गल्लोगल्ली प्रचार करणारे कार्यकर्ते, जोरजोरात वाजणारे लाऊडस्पीकर्स अन् थेट जनसं पर्कावर असणारा जोर. परंतु बदलत्या काळासोबत निवडणूक प्रचाराचा ट्रेन्ड देखील बदलायला लागला आहे. नागपुरातदेखील ऑनलाईन कट्टय़ावरील जनसंपर्क सुरू झाला आहे. अनेक नेत्यांनी तर यासंदर्भात विशेष सेलदेखील स्थापन केला आहे.


*आयटीतील युवक झाले ई-कार्यकर्ते
ह्यआयटीह्ण क्षेत्रात काम करणार्‍या व निरनिराळ्य़ा पक्षांशी संबंधित असणार्‍या अनेक तरुणांनी तर स्वत: पुढाकार घेऊन ह्यऑनलाईनह्ण कट्टय़ांवर निरनिराळ्य़ा माध्यमांतून प्रचारासाठी जोर दिला आहे. हे तरुण एकत्रित येऊन काम करतात. कोणी फेसबुकचे ह्यपेजह्ण सांभाळत आहे तर कोणी विशेष संकेतस्थळ तयार केले आहेत.
*युवावर्गावर भिस्त
अद्याप विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या नसल्या तरी उमेदवारांनी मात्र जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. यात विद्यमान उमेदवारांसोबतच इच्छुकांचादेखील मोठय़ा प्रमाणात भरणा आहे. येणार्‍या निवडणुकांत युवावर्गाला सर्वच पक्षांकडून महत्त्व देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना भावेल अशा माध्यमांतून जनसंपर्क करण्यावर भर देण्यात येत आहे. जनसंपर्क मोहीम तसेच निरनिराळ्य़ा सामाजिक माध्यमातून जनतेपर्यंत आ पली कामे व भूमिका पोहचविण्याची कसरत तर सुरू आहेच. परंतु अनेक उमेदवारांनी मतदारांना व विशेषत: युवावर्गाला प्रभावित करण्यासाठी थेट ह्यऑनलाईन कनेक्शनह्ण वर भर दिला आहे. ह्यफेसबुकह्ण, ह्यटष्‍द्वीटरह्ण, मोबाईलवरील ह्यव्हॉट्सअँपह्ण इत्यादींच्या माध्यमातून ते जनतेच्या संपर्कात राहत आहे त. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या पदाधिकार्‍यांना नेहमी ऑनलाईन राहण्यासाठी स्मार्टफोन घेवून दिले आहेत. त्यामुळे काही कार्यकर्ते ऑनलाईन होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

*सोशल कनेक्टची दिनचर्या
फेसबुक, टष्‍द्वीटर इत्यादींचे अकांऊट नियमित तपासणे.
दररोज सकाळी, सायंकाळी व रात्री नियमितपणे निरनिराळे अपडेट्स टाकणे.
जास्तीत जास्त प्रमाणात मेंबर्स कसे होतील याकरिता प्रयत्न करणे.
एखादी मोहीम, कार्य किंवा योजनेबद्दल माहिती टाकणे.
पक्षासंदर्भातील सकारात्मक बाबी प्रकाशात आणणे.
सोशल नेटवर्किंग साईट्सवर येणार्‍या कमेंट्स, सूचनांचे विश्लेषण करणे.
दुसर्‍या पक्षांच्या ह्यऑनलाईनह्ण हालचालींवर लक्ष ठेवणे.

*सखोल रिसर्च
एकीकडे तरुणाईकडून उमेदवारांचा जनसंपर्क वाढविण्याचे प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे त्यांचा सांख्यिकीदृष्ट्या अभ्यासदेखील सुरू आहे. म तदारांना नेमके काय अपेक्षित आहे, काम करण्यात कुठे अपयश आले आहे, कोणत्या भागात समस्या आहेत तसेच मतदानाचे प्रमाण कसे वाढेल इ त्यादी निरनिराळ्य़ा मुद्यांवर सोशल नेटवर्किंग साईट्सवर येणार्‍या जनतेच्या कमेंट्स, सूचना यांच्या आधारावर विश्लेषण केले जात आहे. विशेषत: पक्ष पातळीवर याला महत्त्व देण्यात येत आहे अशी माहिती एका प्रस्थापित पक्षाच्या पदाधिकार्‍याने दिली.

Web Title: Online HiTech Image Building of Leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.