ऑनलाइन सातबार्याने वाढविली डोकेदुखी!
By admin | Published: April 3, 2017 03:13 AM2017-04-03T03:13:40+5:302017-04-03T03:13:40+5:30
प्रक्रियेत अनेक त्रुटी; शेतक-यांसह प्रशासनावरही ताण.
लोणार (जि. बुलडाणा), दि. २- सातबारा संगणकीकृत ई-फेरफार करण्याची प्रक्रिया राबविताना येणार्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी तसेच शेतकरी आणि जनतेच्या सोईसाठी महसूल विभागाने पावले उचलली आहेत. यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत मार्च २0१७ पर्यंत संपूर्ण राज्यातील सातबारा संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही प्रक्रिया सुलभ रीतीने चालण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्यासाठीही विविध निर्णय घेण्यात आले आहेत; मात्र सदर निर्णय कागदोपत्रीच राहिले असून आजरोजी ऑनलाइन सातबारा प्रक्रिया त्रुटींनी ग्रस्त प्रक्रिया ठरली आहे. यामुळे शेतकर्यांची डोकेदुखी वाढत आहे.
राज्यातील सातबारा संगणीकृत ई-फेरफार करण्याची प्रक्रिया राबविताना येणार्या तांत्रिक अडचणी आणि यामुळे शेतकर्यांची होणारी गैरसोय याबाबत लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने ई-फेरफार आज्ञावलीत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच सामान्य जनतेला वापरण्यास अतिशय सुलभ आणि सुटसुटीत करण्यासाठी आज्ञावलीचे नवीन व्हर्जन तयार करणे, दैनंदिन कामकाजाची देखरेख करण्याकरीता डॅशबोर्ड तयार करणे, आज्ञावलीचे सुरक्षा ऑडिट करणे, सातबारामधील खातेदारांच्या नावात आधार क्रमांकाचा समावेश करणे आणि आज्ञावली वापरात येणार्या अडचणी जिल्हा स्तरावर सोडविणे, ई-फेरफार आज्ञावलीचा सक्षमरीत्या वापर करण्याच्या सारख्या गोष्टीचा यात समावेश आहे.