आॅनलाइन सातबारा, फेरफारला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:20 AM2017-08-07T03:20:01+5:302017-08-07T03:20:01+5:30
शेतक-यांच्या तलाठी कार्यालयाच्या वा-या थांबणार!
ब्रह्मानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शेतकºयांना सातबारा, फेरफार आदी कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयात चकरा मराव्या लागत होत्या. त्यासाठी डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन अंतर्गत जिल्ह्यात एकूण ५ लाख ४० हजार ५५७ सातबारे आॅनलाइन करण्यात आले आहेत. प्रशासकीय स्तरावरून आॅनलाइन सातबारा व फेरफार १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येणार असून, शेतकºयांच्या तलाठी कार्यालयाच्या वाºया आता बंद होणार आहेत.
शेतकºयांना विविध कामांसाठी सातबारा व फेरफारची गरज भासते; मात्र प्रत्येक वेळेस सातबारा व फेरफार काढण्यासाठी शेतकºयांना तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. काही ठिकाणी तर प्रभारी असलेला तलाठी हा गावात येतच नसल्याने गावकºयांना अनेक वेळा तलाठ्याची वाट पाहावी लागते, अशा वेळेस शेतकºयांना त्यांचा सातबारा वेळेवर मिळत नसल्याने त्यांची कामे खोळंबतात. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर सातबारा फेरफार उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाच्यावतीने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोगाम सुरू केला आहे. या प्रोग्रामाच्या माध्यमातून शेतकºयांना आॅनलाइन सात बार, फेरफार उपलब्ध करून देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोगाम अंतर्गत शेतकºयांना शेतीविषयक सर्व रेकॉर्ड आॅनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-फेरफार, ई-चावडी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार ई-फेरफार आज्ञावलीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या दस्ताची नोंद तलाठी रेकॉर्डला आॅनलाइन करण्यात येत आहे. या प्रोग्राम अंतर्गत शेताविषयक तलाठी रेकॉर्डला असलेले १ ते २१ गाव नमुने आॅनलाइन अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ५ लाख ४० हजार ५५७ सातबारे आॅनलाइन करण्यात आले आहेत.
प्रशासकीय स्तरावरून आॅनलाइन सातबारा व फेरफार देण्याचा मुहूर्त १५ आॅगस्ट ठेवण्यात आला आहे. सातबारा वेळेवर म् िमिळण्यासाठी हा आॅनलाइन प्रणाली अत्यंत महत्त्वाची
आहे; मात्र या प्रणालीचा लाभ घेताना शेतकºयांना इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.