खामगाव पालिकेची ऑनलाइन सभा ‘ऑफलाइन’ गाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 12:27 PM2021-02-27T12:27:19+5:302021-02-27T12:29:54+5:30
Khamgaon Municipal council ऑनलाइन आणि ऑफलाइनच्या कचाट्यात सापडलेल्या सभेत शुक्रवारी दोन विषयांना मंजुरी देण्यात आ
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक नगरपालिकेत आयोजित ऑफलाइनसभा रद्दकरून
ऑनलाइन घेण्यात आली. मात्र, सभा होण्यापूर्वीच तक्रारीमुळे चर्चेत आलेली ही सभा ऑनलाइन झाल्यानंतरही ऑफलाइन अधिकच गाजली. ऑनलाइन आणि ऑफलाइनच्या कचाट्यात सापडलेल्या सभेत शुक्रवारी दोन विषयांना मंजुरी देण्यात आली.
शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्या स्वाक्षरीने खामगाव पालिकेची ऑफलाइन विशेष सभा शुक्रवार २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकोपामुळे ही ऑफलाइन सभा रद्द करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष सरस्वती खासणे आणि काँग्रेस नगरसेवकांनी केली. सभा झाल्यास कोविड-१९ आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन होणार असल्याचा मुद्दाही जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत काँग्रेस नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी ऑफलाइन सभा रद्द करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गुरूवारी नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीने शुध्दीपत्रक देत शुक्रवारी ऑनलाइन सभा घेण्यात आली. यामध्ये विषय सुचीवर ०३ सप्टेंबर २०२० च्या सभेचे इतिवृत्त कायम करणे, वैशिष्ट्येपूर्ण अनुदान योजना २०१८-१९ अंतर्गत प्राप्त शासनाच्या पत्रावर विचार विनिमय करून निर्णय घेणे, नगरोत्थान योजना अंतर्गत विचार विनिमय करून निर्णय घेणे हे प्रमुख तीन विषय होते.
सभा तांत्रिक कचाट्यात!
ऑफलाइन सभा रद्द करून ऐनवेळी ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय म्हणजे सत्ताधाºयाचा आततायीपणा आहे. सोयीनुसार ठराव घेण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली. शुध्दीपत्रक देत, सभा घेणे कायदेशीर नसल्याची ओरड विरोधी सदस्यांकडून आता केली जात आहे. या सभेबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे विरोधी सदस्यांनी स्पष्ट केले.
म्युट आणि एक्झीटचा खेळ!
स्थानिक नगर पालिकेच्या सभेत शुक्रवारी म्युट आणि एक्झीटचाही खेळ काही वेळ रंगला. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी विरोधी सदस्यांना सभेत बोलण्याचा अधिकार नाकारण्यात आला. तर काही सदस्यांना जाणीवपूर्वक एक्झीट करण्यात आल्याचा दावा विरोधी सदस्यांकडून केला जात आहे. यासंदर्भात विरोधी सदस्यांनी शुक्रवारी दुपारी मुख्याधिकाºयांकडे तक्रारही दाखल केली.
खामगाव पालिकेतील विरोधी सदस्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाºयांनी ऑफलाइन सभा रद्द करण्याचे निर्देश दिले. शुक्रवारी खामगाव पालिकेत ऑनलाइन सभा घेण्यात आली. कोरोना उपाययोजनेचे सर्वच निकष सभेत पाळण्यात आले.
- मनोहर अकोटकर
मुख्याधिकारी,
नगर परिषद, खामगाव.
विरोधी सदस्यांचा आवाज दाबण्यासाठीच ऑनलाइन सभा घेण्यात आली. या सभेला कोणताही तांत्रिक आधार नाही. संख्याबळाच्या जोरावर सभेत दोन विषय पारित करण्यात आले. यामध्ये एक विषय न्यायप्रविष्ठ असतानाही विषय सूचीवर ठेवण्यात आला.
- अमेयकुमार सानंदा
गटनेता कॉग्रेस, नगर परिषद, खामगाव.