सभापतीच्या ठिय्या आंदोलनामुळे पालिकेची ऑनलाईन सभा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:36 AM2021-03-27T04:36:27+5:302021-03-27T04:36:27+5:30
पालिका प्रशासनाने शासन आदेशान्वये २५ मार्च रोजी ऑनलाईन पध्दतीने सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. ही सभा ऑफलाईन पध्दतीने घ्यावी, ...
पालिका प्रशासनाने शासन आदेशान्वये २५ मार्च रोजी ऑनलाईन पध्दतीने सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.
ही सभा ऑफलाईन पध्दतीने घ्यावी, जेणेकरून आम्हाला आमचे विषय योग्यरित्या मांडता येतील, असे स्पष्ट करीत पाणीपुरवठा सभापती गोपाल देव्हडे यांनी २४ मार्च रोजी मुख्याधिकारींना अर्ज दिला होता. मात्र, नियोजित वेळी सभा ऑनलाईन पध्दतीने होत असल्याने देव्हडे यांनी पालिकेच्या सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान शहरात मोबाईल नेटवर्क व्यवस्थित चालत नाही त्यामुळे ऑनलाईन सभेसाठी अडथळे येतात. दुसरीकडे अधिकारी वर्गाच्या बैठका होतात मग पालिकेच्या सभेला ऑनलाईनचे बंधन कशासाठी असा प्रश्न देव्हडे यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान या ठिय्या आंदोलनामुळे पालिका आवारात गदारोळ उडाल्याने पालिका प्रशासनाला सभा स्थगित करावी लागली.