लसीकरणासाठी ऑनलाइन नाेंदणी ठरतेय डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:53+5:302021-05-12T04:35:53+5:30

अंढेरा : सध्या कोरोनाच्या विळख्यातून वाचण्यासाठी नागरिकांना आशेचा किरण ठरू पाहणाऱ्या कोरोना लसीचे गौडबंगाल वाढतच आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन नागरिकांसाठी ...

Online registration for vaccination is a headache! | लसीकरणासाठी ऑनलाइन नाेंदणी ठरतेय डोकेदुखी!

लसीकरणासाठी ऑनलाइन नाेंदणी ठरतेय डोकेदुखी!

Next

अंढेरा : सध्या कोरोनाच्या विळख्यातून वाचण्यासाठी नागरिकांना आशेचा किरण ठरू पाहणाऱ्या कोरोना लसीचे गौडबंगाल वाढतच आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन नागरिकांसाठी

डोकेदुखी ठरत असून १८ ते ४५ वर्षांच्या व्यक्तींना लसीच्या नोंदणीसाठी कित्येक तास मोबाइलकडे पाहत बसावे लागत आहे. यावर उपाय याेजना करण्याची गरज आहे़

लसीकरणासाठी ऑनलाइन नाेंदणी करावी लागत आहे़ नाेंदणी करण्यासाठी वेबसाइटवर गेल्यास आधीच बुक झाल्याचे आढळते़ त्यामुळे अनेक जण लसीकरणापासून वंचित असल्याचे चित्र आहे़ लस बुक करताना ओटीपी व कोड टाकावा लागत असून हेसुद्धा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीसाठी केवळ तर ४५ पुढील व्यक्तींना लसीकरणासाठी जिल्हाभरात लसीकरण केंद्र सुरू आहेत़ ४५ वर्षांपुढील ज्यांनी प्रथम लसीकरण घेतले नाही ते लसीकरणासाठी ऑनलाइन व ऑफलाइन मिळेल का या आशेवर आरोग्य केंद्रावरील लसीकरण केंद्रांकडे जात असून लस उपलब्ध नसल्याने माघारी परतत आहे. तसेच अनेक ४५ वर्षांपुढील नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून ठेवलेली आहे; परंतु नोंदणी केलेल्या केंद्रावर लसच उपलब्ध नसल्याने नोंदणी करूनही ४५ वर्षांवरील नागरिक हैराण झाले आहेत.

दुसऱ्या डोससाठी ४५ वर्षांवरील नागरिक त्रस्त!

४५ वर्षांवरील नागरिकांचे ठिकठिकाणी गावात जाऊन मोठ्या प्रमाणावर व आरोग्य केंद्रावर लसीकरण करण्यात आले़ त्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांनी शिबिरे आयाेजित केली हाेती़ पहिला डाेस घेतल्यानंतर दुसरा डाेस मिळत नसल्याचे चित्र आहे़ दुसऱ्या डाेससाठी नागरिकांची भटकंती हाेत आहे़

युवकांसाठी केवळ ७ केंद्रे

जिल्हाभरात १ मेपासून १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे़ मात्र, केवळ सातच केंद्रांवर हे लसीकरण हाेत असल्याने अनेक जण वंचित आहेत. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी दोनच केंद्रे आहेत़ लस घेण्यापूर्वी नाेंदणी करावी लागत आहे़ ग्रामीण भागातील अनेकांना ऑनलाइन नाेंदणी करता येत नसल्याचे चित्र आहे़ ग्रामीण भागात मुबलक लस साठा तसेच ऑफलाइन लस देण्याची गरज आहे़

Web Title: Online registration for vaccination is a headache!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.