मुदतवाढीनंतर १४ टक्के शेतकऱ्यांनीच काढला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 12:24 PM2021-07-26T12:24:47+5:302021-07-26T12:24:57+5:30

Crop insurance : जिल्ह्यातील ८४ हजार ५९६ शेतकऱ्यांनी अर्थात १४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला.

Only 14% of farmers took out insurance after the extension | मुदतवाढीनंतर १४ टक्के शेतकऱ्यांनीच काढला विमा

मुदतवाढीनंतर १४ टक्के शेतकऱ्यांनीच काढला विमा

Next

- नीलेश जाेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खरीप पीक विम्यासाठी जवळपास नऊ दिवसांची मुदत वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यातील ८४ हजार ५९६ शेतकऱ्यांनी अर्थात १४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. मात्र, गेल्या वर्षी विमा काढलेल्या शेतकऱ्यांशी यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना करता केवळ ३८ टक्केच शेतकऱ्यांनी विमा काढल्यचे स्पष्ट होत आहे. 
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ८७ हजार ८४८ आहे. यापैकी साधारणत: दरवर्षी ५० टक्के शेतकरी विमा काढतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना आलेले कटू अनुभव पाहता शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्याकडे कल कमी झाला असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसते. त्यातच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गासोबतच प्रशासकीय यंत्रणेमधील दिरंगाई, असा दुहेरी फटका बसत असल्याचे चित्र आहे. 
गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्याला मोठा फटका दिला आहे. २०१९ मध्ये वार्षिक सरासरीच्या २२ टक्के परतीचा पाऊस झाला होता. गेल्या वर्षीही अशीच स्थिती होती. त्यामुळे नेमके उत्पादन हाती येण्याच्या काळातच शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्या तुलनेत विमा कंपन्या व प्रशासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने नुकसान होऊनही पीक विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहत असल्याचा गत दोन वर्षांतील अनुभव आहे. त्यामुळे पीक विम्याच्या नुकसानभरपाई मिळण्याच्या निकषात किंवा आनुषंगिक तांत्रिक बाबींमध्ये बदल करण्याची अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत.
 

Web Title: Only 14% of farmers took out insurance after the extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.