जिल्ह्यातील २४ टक्केच शेतकऱ्यांनी काढला पीक विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:50+5:302021-07-16T04:24:50+5:30
त्यातच २०१३ मध्ये जेथे जिल्ह्यातील अवघ्या ०.३४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता तेथे गेल्या वर्षी ५० टक्के शेतकऱ्यांनी ...
त्यातच २०१३ मध्ये जेथे जिल्ह्यातील अवघ्या ०.३४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता तेथे गेल्या वर्षी ५० टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला, मात्र, लाभाबाबत शाश्वती नसल्याने सध्या या योजनेकडे काही शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. २०१० च्या दशकानंतर शेतकरी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा टक्का यात वाढत गेला. मात्र मधल्या काळात बदलेले निकष व नुकसानानंतर ७२ तासात संबंधित कंपनीला माहिती देण्याची अट, याबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेली अनभिज्ञता यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान होऊनही विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरविण्यास प्रारंभ केल्याचे एकंदरीत चित्र दिसते. त्यातच यासंदर्भातील वेबसाईटही नियमित व वेगाने कार्यरत राहत नसल्याने पीक विमा काढू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागते. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अवघ्या ४७ टक्केच शेतकऱ्यांनी १५ जुलै रोजीच्या शेवटच्या तारखेच्या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत पीक विम्याच्या योजनेसाठी अर्ज करत रक्कम भरली होती.
--आंतरपीकाचीही समस्या--
बऱ्याचदा शेतकरी सोयाबीनसोबत तुरीचे आंतरपीक घेतात. मात्र, विमा काढताना पोर्टलवर शेतकऱ्यांचा अनुषंगीक अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्यासंदर्भात वारंवार विचार करूनही योग्य माहिती उपलब्ध होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या क्षेत्राएवढी पिकाची तथा आंतरपिकाच्या क्षेत्राची बेरीज होत नाही, तोवर पोर्टलवर ते स्वीकारले जात नाही, असे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये यासंदर्भात संभ्रम निर्माण होत आहे.
--अशी पीक विम्याची स्थिती--
जिल्ह्यातील एकूण शेतकरी:- ५,८७,८४८
१५ जुलैपर्यंत पीक विमा काढलेले शेतकरी:- १,३९,४०४ (२३.७१ टक्के)
गेल्या वर्षी पीक विमा काढलेले शेतकरी :- २,९६,१५४ (५०.३७ टक्के)
गतवर्षी शेतकऱ्यांना मिळालेली पीक विम्याची रक्कम:- १७ कोटी
पेरणीचे एकूण क्षेत्र ७ लाख ३४ हजार ७११
प्रत्यक्षात यंदा झालेली पेरणी :- ८२ टक्के
पेरणी बाकी असलेले क्षेत्र :- १८ टक्के
१५ जुलैपर्यंत