केवळ ४९७ बेरोजगारांना झाले कर्जवाटप

By admin | Published: August 26, 2015 11:36 PM2015-08-26T23:36:44+5:302015-08-26T23:36:44+5:30

१२९१ प्रकरणांपैकी मार्चअखेर ४९७ युवकांना स्वयम रोजगारासाठी कर्ज वाटप.

Only 497 unemployed loans have been lost | केवळ ४९७ बेरोजगारांना झाले कर्जवाटप

केवळ ४९७ बेरोजगारांना झाले कर्जवाटप

Next

बुलडाणा : जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम नाही. छोट्या व्यवसायावरच येथील युवक अवलंबून आहेत. त्यातही स्वतंत्र व्यवसाय करायचा म्हणजे कर्जपुरवठा करताना बँकांकडून होणारी अडवणूक आणि हमखास बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे व्यवसायाचे प्रमाणही येथे कमी आहे. तरीेदेखील मार्च २0१५ पर्यंंत ४९७ सुशिक्षित बेरोगारांना विविध व्यवसायांसाठी बँकांनी कर्जपुरवठा केला आहे. महात्मा फुले अर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, अपंग बीजभांडवल योजना आणि जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) मार्फत हे कर्जवाटप करण्यात आले. या सर्व महामंडळाच्या माध्यमातून १२९१ प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी मार्चअखेर ४९७ प्रकरणांची उद्दिष्टपूर्ती करण्यात आली. असे झाले कर्जवाटप विविध आर्थिक विकास महामंडळांमार्फत कर्जपुरवठय़ासाठी आलेली प्रकरणे बँकांकडे मंजुरीसाठी पाठविली जातात. त्यानुसार बँका योग्य असलेली प्रकरणे मंजूर करून कर्जपुरवठा करते. मार्च २0१५ पर्यंंत डीआयसीने ३२0 प्रकरणांचे उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी १३५ प्रकरणे मंजूर करण्यात आले. महात्मा फुले महामंडळामार्फत आलेल्या ४00 पैकी ११७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामार्फत आलेल्या १७२ पैकी १२0 प्रकरणे निकाली काढण्यात आली. वसंतराव नाईक अर्थिक विकास महामंडळाच्या ३0 प्रकरणांपैकी २६, तर अपंग बीजभांडवल योजनेच्या ३७९ प्रकरणांपैकी बँकांनी ९९ प्रकरणे मंजूर करून त्यांना कर्जपुरवठा केला.

Web Title: Only 497 unemployed loans have been lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.