बुलडाणा जिल्ह्यात ७२ विद्यार्थ्यांनाच मायबोलीचा लळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:34 AM2018-02-27T00:34:27+5:302018-02-27T00:34:27+5:30
बुलडाणा : कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा संवर्धनास सध्या प्रशासकीय पातळीवरून प्राधान्य देण्यात येत असले तरी मातृभाषा असलेल्या मराठी विषयाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एम.ए. मराठीची सुविधा तीन महाविद्यालयामध्ये उपलब्ध असून त्यातही जवळपास ७२ विद्यार्थ्यांचेच प्रवेश आहेत.
ब्रम्हानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा संवर्धनास सध्या प्रशासकीय पातळीवरून प्राधान्य देण्यात येत असले तरी मातृभाषा असलेल्या मराठी विषयाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एम.ए. मराठीची सुविधा तीन महाविद्यालयामध्ये उपलब्ध असून त्यातही जवळपास ७२ विद्यार्थ्यांचेच प्रवेश आहेत.
जी मराठी भाषा बोलत आपण लहानाचे मोठे झालो त्या भाषेचा आणखी सखोल अभ्यास करून मराठीचा समृद्ध वारसा जाणण्यासाठी मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (एमए) ची सुविधा महाविद्यालयांमध्ये आहे. परंतू सध्या अनेक विद्यार्थी मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (एम.ए.) करण्यास नकार देत असल्यामुळे मायबोली मराठी भाषेचा लळा दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे दिसून येते. माय मराठी या भाषेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या २७ फेब्रुवारी जन्मदिनाचे औचित्य साधुन ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा केला जा तो. मराठी भाषेचा समृद्ध वारसा टिकूण ठेवण्यासाठी मराठी राजभाषा दिनानिमित्त प्रशासकीय पातळीवरूनही विविध कार्यक्रम राबविले जाता त. मात्र मराठी भाषा अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचा कल कसा, वाढेल याकडे दुर्लक्ष होत असल्याने मराठी भाषेविषयीचे हे प्रयत्न केवळ मराठी राजभाषा दिनापुरतेच र्मयादित राहत आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यं त मोठा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (एम.ए.) करण्याची सुविधा केवळ तीनच महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. त्यातही विद्यार्थ्यांची संख्या केवळ ७२ असल्याने मातृभाषा मराठीकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. बुलडाणा येथील जिजामाता महाविद्यालयामध्ये एम.ए.ची सुविधा असून याठिकाणी केवळ २0 विद्यार्थी एम.ए.करत आहेत. तर चिखली येथील शिवाजी महाविद्यालयात जवळपास २४ आणि मलकापूर येथील जनता कला महाविद्यालयात २८ विद्यार्थी मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (एम.ए.) चे शिक्षण घेत आहे त. एका महाविद्यालयात ८0 ते १00 विद्यार्थी प्रवेशाची क्षमता अस तानाही केवळ २0 ते २५ टक्केच विद्यार्थी एम.ए.मराठी साठी प्रवेश घे त आहेत.
बहिश्यालस्तरावर एम.ए. मराठी परीक्षेस बंदी
एम.ए.ची सुविधा असलेले महाविद्यालये विनाअनुदानीत असल्याने विद्यार्थ्यांकडून जास्त प्रवेश शुल्क आकारतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश न घेता बाहेरून म्हणजे बहिश्यालस्तरावर मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (एमए) ची परीक्षा देत होते. मात्र २0१७-१८ या शैक्षणिक सत्रापासून बहिश्यालस्तरावर एम.ए. मराठी परीक्षेस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे एम.ए. ची परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा लागणार आहे.
पश्चिम विदर्भात ३५ महाविद्यालयात एम.ए.मराठी
पश्चिम विदर्भातील बुलडाणासह अमरावती, अकोला, वाशिम, यव तमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये ३५ महाविद्यालयात मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (एम.ए.) ची सुविधा आहे.
मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (एम.ए.) ची परीक्षा देण्यासाठी बहिश्यालस्तरावरील पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता २0१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून महाविद्यालयातील एम.ए.मराठीचे प्रवेश वाढू शकतात. तसेच भाषा संवर्धनासाठी मराठी विभागाकडून विविध कार्यक्रमही घेण्यात येतात.
- प्रा. अनंत सिरसाट,
मराठी विभाग प्रमुख, जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा