जल, जंगल आणि जमिन टिकले तरच देशाचे भविष्य उज्वल! - पोपटराव पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 02:33 PM2019-07-26T14:33:07+5:302019-07-26T14:34:47+5:30
खामगाव: जल...जंगल...जमीन आणि जन या चतुसुत्रींवरच भारतीय संस्कृती आधारीत असून, आदिवासी हे या संस्कृतीचा मुळ गाभा आहेत, असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्प प्रकल्प समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जल...जंगल...जमीन आणि जन या चतुसुत्रींवरच भारतीय संस्कृती आधारीत असून, आदिवासी हे या संस्कृतीचा मुळ गाभा आहेत, असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्प प्रकल्प समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी येथे केले. जळगाव जामोद तालुक्यातील इको व्हिलेज सालईबन येथे आदिवासींशी संवाद साधताना ते बोलत होते.
पाणी फांउडेशनच्या वाटर स्पर्धेत सहभागी झालेल्या जळगाव जामोद तालुक्यातील विविध गावांची पाहणी करण्यासाठी त्यांनी बुलडाणा जिल्ह्यात दौरा केला. यावेळी त्यांनी जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सालईबन येथील निसर्ग प्रकल्पाला भेट दिली. बांडापिंपळ, वडपाणी या गावातील आदिवांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जल, जंगल, जमिन आणि जनांशी एकरूप झाल्यास भारताला गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र, यासाठी सालईबन, बांडापिंपळ यासारख्या आदिवासी गावांनी हिरवळीशी जी नाळ जोडली आहे. ती प्रत्येकाला कायम ठेवावी लागेल, असेही त्यांनी नि:क्षून सांगितले. भारताची संस्कृती ही आदिवासी जनजातींमध्येच वसलेली आहे. ज्यांनी निसर्गालाच देवता मानल्याने जंगल राखल्या गेली. मात्र, विकासाच्या भ्रामक कल्पनांमुळे वनराई नष्ट होत आहे. ह्यविकासह्ण हे मृगजळ असून त्याच्या मागे धावण्यापेक्षा आपली मूळ टिकून ठेवणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत, बांडापिंपळ, वडपाणी आणि सालईबन यांनी हिरवळीच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबाबत समाधानही व्यक्त केले.
ग्रामसंस्कृतीह्ण हीच विकासाची निती!
भारतातील एकुण लोकसंख्येच्या ७०टक्के लोकसंख्या खेड्यात वसली आहे. ग्रामसंस्कृतीला चालना देण्यासाठी सालईबनचे योगदान मोठं आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेने, आचार्य विनोबांच्या भूदान जमिनीवर आणि गांधीच्या विचारावर ह्यतरूणाईह्णचे काम येथे सुरू आहे. नव भारताच्या निर्मितीचे धडे अनेक युवक गिरवित आहेत. हीच ग्रामस्वराज्याची संकल्पना आपआपल्या गावात राबवित आहेत. ही नक्कीच परिवर्तनाची नांदी म्हणता येईल.
खेड्याकडे चला या मूलमंत्राचा अंगिकार करा!
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ह्यखेड्या कडे चलाह्णहा मूलमंत्र दिला आहे. देशात सर्वत्र त्यांची १५० वी जयंती साजरी होत आहे. समाजातील इतर घटकांनी सुध्दा गांधी-विनोबाजींच्या सर्वोदयी विचारांचा अंगिकार करीत, स्वप्नातील भारत घडविण्यासाठी सज्ज व्हावे, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.