अंगणवाडीत विद्यार्थी केवळ पटावरच

By admin | Published: July 5, 2017 01:50 PM2017-07-05T13:50:42+5:302017-07-05T13:50:42+5:30

अंगणवाड्यांमध्ये अनेक मुले केवळ पटावरचशिक्षण घेत असून, प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थितच नसल्याचा धक्कादायकप्रकार उघडकीस आला आहे.

Only students on anganwadi | अंगणवाडीत विद्यार्थी केवळ पटावरच

अंगणवाडीत विद्यार्थी केवळ पटावरच

Next

सिंदखेडराजा: तालुक्यामध्ये शहरासह गावागावात वस्तीवाड्यावर शासनाने
अंगणवाड्या सुरु केल्या. या अंगणवाड्यांमध्ये अनेक मुले केवळ पटावरच
शिक्षण घेत असून, प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थितच नसल्याचा धक्कादायक
प्रकार उघडकीस आला आहे.
    संवर्ग विकास अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी महेश सुळे यांनी माळ
सावरगाव सह शहरातील अंगणवाड्यांना ३ जुलै रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजता
भेटी दिल्या. सावरगाव माळ येथील अंगणवाडीत एकही बालक आढळून आला नाही.
सिंदखेडराजा तालुक्यामध्ये २०३ अंगणवाडी व ७ मीनी अंगणवाडी अशा २१०
अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये ६ हजार ७६० मुले व ५ हजार ९७८ मुली अशी एकूण
१२ हजार ७३८ पटसंख्या कागदोपत्री नोंद आहे. ९ जुन्या व ६८ अंगणवाड्यंना
नविन इमारती आहेत. अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आहे. ६
महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना शिरा ९६० ग्रॅम, उममा ९६०
ग्रॅम, सातु ९६० ग्रॅम व पॅकबंद पाकीट पंचविस दिवसासाठी तीन पाकीट घरपोच
ची सुविधा आहे. गरोदर स्तनदा मातांना शिरा ११२० ग्रॅम, उपमा सुकळी ११२०
ग्रॅम व पॅकबंद पाकीट २५ दिवसासाठी ३ पाकीट घरपोच, ३ ते ६ वर्ष
लाभार्थ्यांना गरम ताजा आहार खिचडी, कडधान्य, उसळ, लापसी ९० ग्रॅम तांदूळ
व १० ग्रॅम दाळ, २० ग्रॅम मटकी, २० ग्रॅम वटाना उसळ दररोज केंद्रामध्ये
देण्यात यावा. किशोर मुली १५ ते १८ वयोगटातील उपमा, सातु, शिरा व २५
दिवसासाठी ३ पॅकबंद पाकीट घरपोच देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे.  मात्र
३ जुलै रोजी आमचे प्रतिनिधी व संवर्ग विकास अधिकारी तथा बालविकास प्रकल्प
अधिकारी महेश सुळे यांनी माळ सावरगाव येथील अंगणवाडीला भेट दिली असता
एकही बालक उपस्थित नव्हते. बालकांच्या घरोघरी जाऊन पालकांच्या भेटी
घेतल्या असता बालक अंगणवाडीत किती वाजता जाते किती वाजता घरी येते,
बालकांना पोषण आहार काय दिल्या जातो तर तांदळाच्या खिचडी शिवाय काही
सांगता आले नाही. बालकांना पूर्वशालेय शिक्षण, गीत, गाणे, खेळ शिकविल्या
जाते काय, याबद्दल पालक अनभिज्ञ असून शेतामध्ये कामे सुरु असल्यामुळे
बालकांना शेतात घेऊन जावे लागते. अंगणवाड्या प्रकल्पा संदर्भात पालक
संभ्रमावस्थेत दिसले. तर सिंदखेडराजा येथील अंगणवाड्यांना सकाळी ९ ते १०
वाजता भेटी दिल्या असता तीन अंगणवाड्यांना ताळे लावलेले असून त्या बंदच
दिसल्या, अशीच अवस्था तालुक्यातील बहुसंख्य अंगणवाड्यांची असून
प्रशासनातील यंत्रणेची उदासिनता दिसून आली. शासनाचा हेतु साध्य
करण्यासाठी शासन, स्थानिक शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, पदाधिकारी व पालक
यांनी समन्वयाने योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी कठोर प्रयत्न व वैयक्तीक
सहभाग नोंदविणे काळाची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Only students on anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.