जिल्ह्यात केवळ तीन टक्के खतसाठा उपलब्ध

By admin | Published: May 30, 2017 12:57 AM2017-05-30T00:57:12+5:302017-05-30T00:57:12+5:30

कृषी विभागाचा गतवर्षीच्या खतसाठ्यावर भर!

Only three percent of the fertilizer available in the district | जिल्ह्यात केवळ तीन टक्के खतसाठा उपलब्ध

जिल्ह्यात केवळ तीन टक्के खतसाठा उपलब्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खरीप हंगाम २०१७-१८ साठी कृषी विभागाकडून नियोजनानुसार १ लाख ३६ हजार मे.टन रासायनिक खतांची जिल्ह्यात आवश्यकता आहे. यापैकी खरिपाच्या तोंडावर जिल्ह्यात केवळ ३ हजार मे.टन खत उपलब्ध झाले आहे; मात्र गतवर्षीचे २३ हजार २८८ मे.टन खत शिल्लक असल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी खताच्या मंजूर कोट्याला गतवर्षीच्या शिल्लक खताचा आधार होणार आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, शेतकऱ्यांसाठी १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटल विविध बियाणे तसेच १ लाख ३६ हजार मे.टन खतांची मागणी आहे. शिवाय मान्सूनचे वेध लागल्यामुळे शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. सुरू झालेली खत, बियाणे उपलब्धतेची गती संथ आहे; परंतु मंजूर कोट्यानुसार खते, बियाणे उपलब्ध होतील, असा दावा कृषी विभागाने केला आहे.
यावर्षी हंगामापर्यंत पुरेसा खतसाठा उपलब्ध नसला तरी, यंदाचा ३ हजार मे.टन व गतर्षीचा २३ हजार २८८ मे.टन खतासाठी असा एकूण २६ हजार ३०३ मे.टन. रासायनिक खतसाठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. यात युरिया, सल्फेट, एस.एस.पी., डी.ए.पी., एम.ओ.पी असे एकूण १२६६४ मे.टन, संयुक्त खते १३३३३ मे.टन आणि मिश्र खते ३०६ मे.टन शिल्लक आहे. यामुळे एकूण उपलब्ध खतसाठ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

१ लाख ३६ हजार क्विंटल बियाण्याची मागणी
जल्ह्यात २०१७-१८ या खरीप हंगामात १०० टक्के पेरणीचे उद्दिष्टपूर्ती डोळ्यापुढे ठेवून कृषी विभागाकडून बियाणे व खतांचे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या बियाणे पुरवठा व विक्री अहवालानुसार खरीप हंगामात यंदा १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटल विविध बियाण्याची मागणी आहे; मात्र वेळेपर्यंत पेरणीसाठी बियाणे उपलब्ध झाले नाही.

यंदा खताच्या मागणीत घट
२०१६-१७ च्या खरीप हंगामासाठी १ लाख ५८ हजार मे.टन खत आवंटनाला मंजुरात देण्यात आली होती. त्यापैकी १ लाख २२ हजार मे.टन खत खरीप हंगामात वापरले गेले; मात्र २०१७-१८ च्या खरीप हंगामात खताच्या मागणीत घट झाली असून, यंदा केवळ १ लाख ३६ हजार मे.टन खताची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Only three percent of the fertilizer available in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.