हंगामातील ज्वारी खरेदी केवळ दोनच महिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 12:50 PM2020-10-04T12:50:03+5:302020-10-04T12:50:12+5:30
Agriculture News Khamgaon दोन महिनेच खरेदी केंद्र सुरू राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्यात भरड धान्य खरेदी योजनेंतर्गंत ज्वारी, मका, बाजरीच्या खरेदीला १ नोव्हेंबरपासून सुरूवात केली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून ३१ डिसेंबरपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा आदेश शासनाने मंगळवारी दिला आहे. दोन महिनेच खरेदी केंद्र सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे, संकरित ज्वारीला बºयापैकी म्हणजे, २६२० रुपए प्रतिक्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत धान्य विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गंत २०२०-२१ मध्ये ही योजना सुरू होत आहे. राज्यात महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशन, राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत खरेदी प्रक्रीया राबवली जाणार आहे. ज्वारी, बाजरी मका, धान, रागी या भरड धान्याची खरेदी या संस्थांकडे देण्यात आली. दरम्यान सध्या ज्वारीलाही जिल्ह्यात चांगला भाव मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.