बुलडाणा जिल्ह्यातील ३२२ होमगार्ड भरतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 02:34 PM2019-08-06T14:34:13+5:302019-08-06T14:34:25+5:30

अनेक दिवसांपासून सुरू असलेला होमगार्ड भरती प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला.

Open the road for recruitment of 322 Homeguards in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यातील ३२२ होमगार्ड भरतीचा मार्ग मोकळा

बुलडाणा जिल्ह्यातील ३२२ होमगार्ड भरतीचा मार्ग मोकळा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची तयारी सुरू आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेला होमगार्ड भरती प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, जिल्ह्यात ३२२ नवीन होमगार्डची निवड करण्यात आली आहे. या नवीन होमगार्डची जिल्ह्यातील सात तालुक्यातील पोलीस ताफ्याला साथ लाभणार आहे.
पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन गृहरक्षक दलाचे सदस्य आपली भूमिका चोखपणे पार पाडत असतात. पोलिसांच्या कमी संख्याबळामुळे होमगार्डची पोलिसांना नेहमीच मदत होत असते. आगामी गणेशोत्सव, दुर्गाउत्सव, यात्राबंदोबस्त, निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन प्रशासनाकडून होमगार्ड भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून राबविण्यात येत आहे. जिल्हा होमगार्ड विभागात अनेक दिवसांपासून ही भरती प्रकिया राबवण्यात येत होती.
पोलिसांना बंदोबस्तासाठी मदत म्हणून होमगार्डचा वापर करण्यात येतो. होमगार्डच्या पदासाठी समुपदेकशक विभागाकडून अनेक वेळा नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
तालुकानिहाय ही भरती प्रक्रिया असून उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर त्यांची शारीरिक तपासणी करण्यात आली. हे उमेदवार यामध्ये पात्र ठरले त्यांची शारीरिक चाचणीसाठी निवड करण्यात आली. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर; शारीरिक चाचणी घेण्यात आली. जिल्हा समादेशक होमगार्डकडून जिल्ह्याकरीता ३२२ होमगार्डची निवड करण्यात आली आहे. या नवीन होमगार्डची नियुक्ती सात तालुक्यात पथकामध्ये करण्यात आली आहे. त्यामध्ये बुलडाणा, चिखली, खमगाव, जळगाव जामोद, मलकापूर, देऊळगाव राजा व मेहकर या तालुक्यांचा समावेश आहे. या होमगार्डची अंतिम पथक निहाय निवड यादी विभागाने जाहीर केली असून, पुढील प्रक्रियेच्या हालचाली सुरू आहेत.


पथक निहाय होमगार्ड
जिल्ह्यात एकूण ३२२ होमगार्ड नवीन नेमण्यात आले आहेत. त्यामध्ये बुलडाणा पथकामध्ये ६४ होमगार्ड, चिखली पथकामध्ये ४७, खामगाव ४४, जळगाव जामोद ३, मलकापूर ३०, देऊळगाव राजा ४६ व मेहकर पथकामध्ये ४४ होमगार्डची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Open the road for recruitment of 322 Homeguards in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.