मुक्त विद्यापीठाची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:38 AM2021-09-21T04:38:01+5:302021-09-21T04:38:01+5:30
पैशाच्या वादातून एकास चाकू भोसकला धाड: धाड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या धामणगाव धाड येथील रहिवासी संतोष दगडूबा सुराशे यांचे ...
पैशाच्या वादातून एकास चाकू भोसकला
धाड: धाड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या धामणगाव धाड येथील रहिवासी संतोष दगडूबा सुराशे यांचे आरोपी राजू वसंता महाले यांच्याकडे उधारीचे पाच रुपये बाकी होते. दरम्यान, आरोपी राजूने १५ सप्टेंबर रोजी संतोषच्या घरासमोर जाऊन त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्या वेळी संतोषने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. यानंतर आरोपी राजू महाले याने सोबत आणलेल्या धारदार चाकूने संतोषच्या बरगडीत जोरदार वार केला. फिर्यादीवरून धाड पोलिसांत गुन्हा दाखल करून राजू महाले यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चंदन यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच रेशन कार्डचे वाटप
बुलडाणा : अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून स्वत:ला समाधान मानणाऱ्या स्व. राणा चंदन यांच्या मृत्यूच्या अखेरच्या दिवशी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरिबांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले. शहरातील जवाईनगर, तेलगुनगर, गावळीपुरा, जोहरनगर, मिर्झानगर, इक्बालनगर येथील गरिबांना रेशनकार्ड बनविण्यासाठी स्वाभिमानीचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे. रफिक शे. करीम यांच्या माध्यमातून तहसील कार्यालयात तयार करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली होती. ५२ कुटुंबांचे हे कार्ड त्वरित मिळावे, यासाठी राणा चंदन यांचा सतत पाठपुरावा सुरु होता.
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी पवार
सावखेड नागरे : पोफळ शिवणी येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी उमेश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात १४ सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरंपच पंजाबराव देशमुख हे होते. तर सरपंच संतोष घाडगे, ग्रामसेवक के. के. जाधव, कडुबा राठोड, गजानन पवार, राजेश राठोड, सुदर्शन पवार यांच्यासह गावकरी उपस्थित होते. या ग्रामसभेत सर्वानुमते पवार यांची निवड करण्यात आली आहे.